Jump to content

पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/१३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
अेक अुद्योग ]

[१२९


 नाना विद्या ज्ञातृत्व कांही । कवीश्वरावीण नाही । कवीपासूनि सर्वही । सर्वज्ञता ॥

ज्ञानेश्वरकृत गणपतिस्वरूप

      वेद   -मूर्ति
      निर्दोष वर्ण     -सौंदर्य
      स्मृतिग्रंथ   -अवयव
      पुराणें   -रत्नखचित अलंकार
      तत्त्वें   -रत्ने
      छंदोबद्धता   -कोंदणें
      अत्तम शब्दरचना-वस्त्र
      शब्दार्थालंकार   -चकचकीत तंतु
      काव्यनाटकें   -पायांतील घागया
      विबुद्धि    -कमरेचा शेला
      षट्शास्त्र-सहा हात
      तत्त्वदर्शनें   -आयुधे
      वेदान्त   -मोदक
      ब्रह्मसुखानंद   -सोंड
      ज्ञान   -डोळे
      चर्चा व वाद   -दांत
      अभय मीमांसा   -कान
      द्वैताद्वैत   -गंडस्थळें
      अपनिषदें   -मस्तकावरील पुष्पें

 (१२४) रामदासांनी कवींना अद्देशून हीं सर्व विशेषणे लावलेली असली, तरी त्यांच्या डोळ्यापुढे मुख्यतः वाल्मीकि व व्यास हेच दोन कवि असावेत असें वाटतें. कित्येकांच्या मतें रामदास स्वतः कवि असल्याचा अभिमान त्यांना होता म्हणून स्वजातीयांची स्तुति करणें त्यांना प्रिय असणारच. मग त्यांच्या डोळ्यापुढे कोण कवि असतील देव जाणे. पण आपणापुढे प्रश्न तो नाही. समर्थांनी कवींना लावलेली विशेषणें लक्षांत मा. ज. अ. ९