Jump to content

पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/१३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
अेक अुद्योग ]

[१२७


बसतात. तीच गोष्ट कांही ललितकला व त्यांतील कलावंत यांचीहि समजावी. कारण उत्कृष्ट गवअी, उत्कृष्ट चितारी, उत्कृष्ट नट-नर्तक, अुत्कृष्ट शिल्पी हा वाङमयसाहित्य वाचून तयार होत नसतो. पण तो बराचसा स्वयंसिद्ध असतो व त्याला कांही ज्ञान, वर सांगितल्याप्रमाणें, परंपरागत तोंडी दुसऱ्याकडून व कांही स्वतःच्या हाताने प्रत्यक्ष करून मिळालेलें असतें.
 (१२३) हें असें आहे तर साहित्य वाङ्मय यांना जगांत अितका मान कां मिळावा ? आणि मिळाला तर तो सर्वस्वी अकारण असेल काय ? मात्र हा मान सर्व देशांत मिळत आलेला आहे हें खरें. कोणत्याहि देशाचा अतिहास लिहितांना त्या देशांतील वैभवसंपन्न राजे, पराक्रमी वीर, चतुर मुत्सद्दी अित्यादिकांच्या बरोबरीने त्यांतील तत्त्ववेत्ते, कवि, पंडित, विद्वान, साहित्यिक यांचीहि माहिती व वर्णनें अितिहासकार देतात. किंबहुना तीं दिल्याशिवाय आपल्या ग्रंथाला पूर्णता आली असें त्यांना वाटत नाही. आपल्या आर्यभूमीचेंच अुदाहरण घेअूं. यांतील वैय्याकरण मीमांसक साहित्याचार्य यांनी मनुष्यवाणीच्या शब्दाला सर्वोत्तम स्थान दिलें आहे व त्याचें मूल्य सर्वश्रेष्ठ ठरविलें आहे. याविषयी कांही वचनें देतां येतील. 'एकः शब्दः सम्यक् ज्ञातः सम्यक् प्रयुक्तः स्वर्गे लोके कामधुक् भवति ' - 'एकच शब्द पण त्याचा खरा अर्थ समजला व त्याचा योग्य अुपयोग केला तर तो 'स्वर्गामध्येहि सर्व मनकामना पूर्ण करूं शकतो.' तसेंच साहित्यशास्त्रकार मनुष्यवाणीचें ( अर्थात् वाङ्मयाचें) वर्णन कसें करतात पाहा. अेकजण म्हणतो-
  अिहि शिष्टानुशिष्टानाम् शिष्टानामपि सर्वथा ।
  वाचां अेव प्रसादेन लोकयात्रा प्रवर्तते ॥
 ( या जगांत स्वयंसिद्ध शिष्ट (विद्वान शास्त्रज्ञ ) व शिष्टामागून जाणारे अितर शिष्ट यांच्या वाणीच्या प्रसादानेच सर्व समाजजीवन चालू राहते. )   अिदं अंधतमः कृत्स्नं जायेत भुवनत्रयं ।
  यदि शब्दाव्हयं ज्योतिः आसंसारं न दीप्यते ॥
 ( हें सर्व त्रिभुवन एरवी ( अज्ञान ) अंधकाराने भरून गेलें असतें पण तें जात नाही याचें कारण शब्द ( मनुष्यवाणी - वाङ्मय) नांवाची जी ओक ज्योत आहे ती सर्व जगभर आपल्या प्रकाश पाडीत राहिली आहे. )