Jump to content

पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/१२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
११६]

[माझा जन्मभरचा


तो, कांही विषयांत तरी, मला साधलाच नसता हें मात्र मी मान्य करीत नाही. तसेंच सामान्य लोकांपेक्षा थोडें अधिक खोलात जाअून विषयाभ्यास केल्याबरोबर जे घमंडानंदन स्वतः मोठे तज्ज्ञ ( Expert ) म्हणून मिरवूं पाहतात त्यांचें मला हसूं येतें. ' हास्यविनोदमीमांसा' हा जो ग्रंथ मी लिहिला तो माझ्या संशोधक चिकित्सक अभ्यासू शास्त्रीय बुद्धीचा अेक पुरावा व चांगला नमुना आहे असें मला वाटतें. विनोद या विषयाची चिकित्सा मराठी भाषेतून अितर कोणीहि माझ्याअितकी समर्पक केलेली नाही. त्या विषयावर मी स्वतःचें स्वतंत्र असेंहि कांही सांगितलें आहे. आणि त्या विषयज्ञानांत चांगली भर घातली आहे असें वाटतें. तथापि मला स्वतःला त्यांतहि expert म्हणवून घेणें बरें वाटत नाहीं.
 ( १०९) विद्या संपादन करण्याच्या दोन रीति असतात. अेकीला अेकांगी व दुसरीला अनेकांगी असें नांव देतां येअील. पैकी मी अनेकांगीं रीतीचा अनुयायी, कांही आवडीने पण कांही गरजेने व परिस्थितीने हि ठरलों. आवड ही की जो जो म्हणून ज्ञानाचा विषय तो, अगदी वरवर कां होअीना, पण थोडासा तरी समजून घ्यावा. पण तो केवळ पांडित्यप्रदर्शनाकरिता असें मात्र नव्हे. ही भ्रमरी वृत्ति म्हणावी ! भ्रमर हा स्वतः मध बाहेरून गोळा करून आणीत नाही. तर ज्या ज्या फुलांत त्याला तो मध मिळूं शकेल त्यावर थोडा वेळ बसून त्या मधाचें सेवन करतो. दुसऱ्या टोकाचें अुदाहरण मधमाशांचें. त्यांचा अुद्योग असा की, मिळेल तेथून मध गोळा करून अेखादें पोळे बनवून त्यांत त्याचा संग्रह करावयाचा. स्वतः मधमाशा तो मध खातात किंवा नाही हें मला माहीत नाही. देव जाणे. जन्मभर ज्यांनी अभ्यास करून स्वत:चें मन समृद्ध केलें, पण दुसऱ्यांना त्या ज्ञानाचा लाभ होण्यासारखी अेक ओळहि सान्या जन्मांत लिहिली नाही, असेहि 'विद्यार्थी ' हमाल मी कांही पाहिले आहेत. अुलट ज्यांनी पुष्कळ लिहिलें पण त्यांत मिळविलेलें ज्ञान संपून गेलें, त्यांच्या स्वतःजवळ कांही शिल्लक राहिलें नाही, असे दुसरेहि कांही लोक मी पाहिले आहेत. त्यांना विद्यार्थी हें नांवहि मी देअूं अिच्छीत नाही. सदासर्वदा वर्तमानपत्री लिहिणारे हे या दुसऱ्या वर्गांत पडतात. अखाद्या मजूर कुटुंबाप्रमाणें त्यांचा क्रम म्हटला म्हणजे रोज त्या दिवसापुरता शिधा विकत आणावयाचा, त्याचा स्वयंपाक