Jump to content

पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/१११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
१०४]

[माझा जन्मभरचा


  प्रज्ञा विघृष्ट प्रतिभा- मणिदीपप्रकाशितं
  संसारालेख्यभांडारं पश्येदं रंगमंदिरम्'

 नाटकगृहाच्या या वर्णनांत थोडक्यांत सर्व कांही त्याविषयीचें मर्म आलें आहे.
 (९३) यानंतर ता. २० जुलै १९२० रोजीं वासुदेवशास्त्री खरे यांच्या अध्यक्षतेखाली ' अितिहास व अितिहाससंशोधन' या विषयावर भा. अि. सं. मं. च्या विद्यमानें माझें व्याख्यान व्हावयाचें रलें. तेव्हा त्या प्रसंगाकरिता मी, सुभाषितपद्धति डोळयांपुढे ठेवून, अितिहाससंशोधक-वर्णनपर असे खालील संस्कृत श्लोक केले--
   "अद्ध्वस्तवर्णरुचिचित्रकलापहर्म्य :
   विच्छिन्नलेखनपुराणशिलासनस्थ:।
  दुष्कीटभुक्तशतपत्र पटोत्तरीयः
   निर्मूल्यनाणकगणैः परिपूर्णकोशः ॥ १ ॥
  नष्टाधिकारपरिहासितगर्वमुद्रः
   संदेहवृत्तिवशवृंहणयंत्रदृष्टि:
  श्रद्धावितर्कपरिचारकवेष्टितांग:
   संशोधकः खलु प्रशास्ति विशून्यराज्यम् " ॥ २ ॥
 मला वाटतें, हे श्लोक अितके मार्मिक अर्थपूर्ण असे साधले आहेत की त्या कृतीचा मला खरोखर अभिमान वाटतो. आणि ' असे श्लोक या विषयावर तुम्ही करा पाहूं ' असें आव्हान मी थट्टेने, माझ्या बरोबरीच्या संस्कृतज्ञांना, (म्हणजे माझ्याइतकाच संस्कृताशीं अल्प परिचय असणा-या अज्ञांना ! ) देअूं शकेन. खरेशास्त्री यांना हे श्लोक फारच आवडल्याचें त्यांनी मला सांगितलें. कारण त्यांत जुन्या सुभाषितांची खोटी अैट चांगली साधली आहे! !
 (९४) यानंतर मी सिमल्यास कायदेमंडळाच्या कामावर असतां, कृष्णशास्त्री कवडे यांनी आपलें 'क्लोमनिर्णय' नांवाचें लहानसें स्वकृत संस्कृत