Jump to content

पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/१०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
१०२]

[माझा जन्मभरचा


 (९०) १९२९ साली मी जबलपूर येथे भरलेल्या 'हिंदु महासभे'च्या अधिवेशनाचा अध्यक्ष होतों. त्या वेळीं अध्यक्ष या नात्याने मी लिहिलेल्या अिंग्रजी भाषणाचा हिंदी तर्जुमा सभेच्या चालकांनी हिंदींत करवून छापून घेतला होता. त्यावरून मी आपलें सर्व भाषण हिंदींतूनच वाचून दाखविलें. तें मी बिनचूक अितकेंच नव्हे, तर शब्दांवर यथायोग्य जोर देअून व योग्य अुच्चार करून वाचून दाखविलें असें म्हणून, तेथील प्रमुख लोकांनी मला शाबासकी दिली. पण या छापील भाषणाशिवाय अगदी आयत्या वेळी अेक पानभर मजकूर मी स्वतः वेगळा हिंदींत लिहून काढला. कारण जबलपुरास पोचल्यावर तेथील लोकांनी माझी मिरवणूक काढून जें मोठ्या थाटाने स्वागत केलें, त्याबद्दल मला लोकांचे आभार मानावयाचे होते. अर्थात् हा आयत्या वेळचा मजकूर छापील भाषणांत घालणें शक्य नव्हतें. पण तो अवश्यहि होता. म्हणून मीच तो लिहून काढला व पंडित मदन मोहन मालवीय यांना दाखविला. त्याचें त्यांना विशेष आश्चर्य वाटलें. त्यांनी अेकदोनच ठिकाणीं किंचित् दुरुस्ती केली, व बाकीचा सर्व प्रबंध बरोबर आहे असें सांगितलें. तसेंच पूर्वी मुझफरनगर येथे असाच अेका सभेचा मी अध्यक्ष असतां तेथेहि, मला हिंदी अितकें चांगलें कसें समजतें व बरोबर वाचतां येतें, याविषयी तेथील लोकांनीहि आश्चर्य प्रकट केलें होतें. तीच गोष्ट पुण्यांतील हिंदी साहित्य-संमेलनप्रसंगीहि घडली.
 (९१) पण हिंदी व मराठी लोकांच्या भाषाज्ञानासंबंधाने परस्पर असा फरक नेहमीच पडतो. याचें अेक कारण असें की मराठी भाषा, म्हणजे तिचें व्याकरण, हें हिंदी व्याकरणापेक्षा अधिक अवघड आहे. दुसरें असें की, हिंदी प्रांतांतील लोकांच्या कानांवर वर्षानुवर्षांत मराठी भाषा जितकी पडते त्यापेक्षा आम्हां महाराष्ट्रांतील लोकांच्या कानांवर हिंदी भाषा नेहमीं पुष्कळ अधिक पडते. तिकडल्या प्रांतांत निव्वळ महाराष्ट्रीय लोकांची वस्ती फार थोडी. पण अिकडे मुसलमान व परदेशी हिंदु वसाहतवाले व्यापारी तसेच भय्ये हे घरीं व बाहेर हिंदी व हिंदुस्थानी बोलतात. किंबहुना अिकडील कोणत्याहि मोठ्या गांवच्या बाजारांत निम्माशिम्मा व्यवहार हिंदी भाषेतूनच चालतो. आमच्या अिकडील ब्राह्मणांच्या बायकांपेक्षा अितर जातींच्या वायकांना हिंदी अधिक समजतें, नागपूर प्रांतांतले माधवराव सप्रे, कानपूरचे पराडकर,