पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/७०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
६८२
 

अजूनही मोठा मान मिळतो तो यामुळेच.
 बाळशास्त्री जांभेकर यांच्यापासून सुरू झालेला महाराष्ट्रातील हा समाजसुधारणेचा प्रवाह मोठा सकस आणि जोमदार होता. आणि तो तसाच चालला असता तर आज महाराष्ट्र समाजसुधारणेच्या दृष्टीने अग्रस्थानी राहिला असता. पण तसे व्हावयाचे नव्हते. एका अगदी अनपेक्षित अशा कारणाने तो येथे कुंठित झाला.

विषमता
 वर अनेक ठिकाणी सांगितलेच आहे की येथल्या धार्मिक, सामाजिक, राजकीय सर्व प्रकारच्या सुधारणांमागे पाश्चात्य भौतिक विद्या ही प्रमुख प्रेरणा होती. पण या विद्येचे अध्ययन व उपासना महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी जशी केली तशी ब्राह्मणेतर समाजाने केली नाही. त्यामुळे या दोन समाजांच्या उत्कर्षांमध्ये फार मोठी तफावत पडून त्यांच्यांत समता प्रस्थापित होण्याऐवजी विषमताच निर्माण झाली आणि ती दिवसेंदिवस रुंदावत चालली.

ब्राह्मणांची मक्तेदारी ?
 ब्राह्मणेतरांनी भौतिक विद्येची उपासना केली नाही एवढेच नव्हे, तर ब्राह्मणांनी आम्हांला विद्येपासून वंचित केले, असा सतत आक्रोश चालू ठेवला. वास्तविक जोतिबा फुले अपृश्यांसाठीसुद्धा शाळा स्थापू शकले. त्यांचे सहकारी अनेक ब्राह्मण होते. असे असताना मराठ्यांना विद्येपासून दूर ठेवणे ब्राह्मणांच्या मनात असते तरी त्यांना ते शक्य नव्हते. वास्तविक प्राचीन काळी सुद्धा क्षत्रिय व वैश्य यांना वेदाध्ययनाचा अधिकार होता. संतांच्या काळात तर निम्याहून अधिक संत ब्राह्मणेतर होते. काहीतर शुद्रही होते. तरी सर्व हिंदुस्थानात ते धर्मोपदेशकाचे कार्य (जी ब्राह्मणांची मक्तेदारी असे मानलेले होते) करीत असत. आणि अनेक ब्राह्मण त्यांचे शिष्यत्वही पत्करीत असत. पण हे मागल्या काळचे सोडून दिले तरी एक गोष्ट स्पष्ट आहे की फ्रेजर नावाच्या इंग्रज पंडिताने म्हटल्याप्रमाणे, इंग्रजी राज्य प्रस्थापित होताच विद्येच्या क्षेत्रातील ब्राह्मणांची मक्तेदारी संपली आणि विद्या सर्वांना सुलभ झाली. मिशनऱ्यांनी तर हिंदूंमधील हीनवर्णीयांच्या साठी अनेक ठिकाणी शाळा उघडल्या होत्या. बडोद्याचे सयाजीराव महाराज, कोल्हापूरचे शाहू छत्रपती, ग्वाल्हेरचे शिंदे महाराज यांनी मराठ्यांमध्ये विद्याप्रसार करण्याचे आटोकाट प्रयत्न केले. पण त्यांना शेवटी निराश व्हावे लागले. मराठ्यांना विलायतेला जाण्यासाठीसुद्धा त्यांनी निधी ठेविले होते. पण त्याचा कोणी फायदा घेतला नाही. बंगालमध्ये रॉय, चतर्जी, बॅनर्जी, टागोर या ब्राह्मण घराण्यांप्रमाणेच घोष, बोस, पाल, दत्त हीही घराणी विद्यासंपन्न झाली. आणि लालमोहन, आनंद मोहन, रासबिहारी, अरविंद, बारींद्रकुमार घोष, रमेशचंद्र दत्त, विवेकानंद, जगदीशचंद्र सुभाषचंद्र असे एकेक रथी-महारथी या ब्राह्मणेतर घराण्यांत