पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
३७
अस्मितेचा उदय
 

असलेल्या तीन महाराष्ट्रकांचा तो अधिपती झाला असे म्हटले आहे. यावरून वर जिंकलेले म्हैसूर, गुजराथ, माळवा इ. प्रदेश म्हणजे पुढल्याच श्लोकातील तीन महाराष्ट्र, असा शेंडे यांनी अर्थ केला आहे. असा अर्थ होणे शक्य आहे हे खरे. पण केवळ एवढया निर्देशावरून म्हैसूर, गुजराथ, माळवा हे प्रदेश म्हणजे महाराष्ट्राचाच विभाग होता असे म्हणणे युक्त वाटत नाही. ज्या प्रदेशात महाराष्ट्री प्राकृत भाषा किंवा महाराष्ट्री अपभ्रंश भाषा या प्रचलित होत्या, जेथे या भाषेत ग्रंथरचना होत असे, शिलालेख लिहिले जात होते आणि हे सर्व विपुल प्रमाणात होत होते त्यालाच महाराष्ट्र म्हणता येईल. एरवी नाही. अशी प्रमाणे वरील देशात मुळीच मिळत नाहीत. एकतर वनवासी, गंग, गुजराथ या जिंकलेल्या प्रदेशांचा उल्लेख 'तीन महाराष्ट्रके' यात आहे हे निश्चित नाही. आणि दुसरे म्हणजे एका निर्देशावरून एवढा अर्थ लावणे साहसाचेच होय. शं. वा. जोशी यांनी ज्या विचारपद्धतीचा आपल्या पुस्तकात अवलंब केला आहे त्या पद्धतीने शेंडे यांचे प्रतिपादनही सयुक्तिक मानावे लागेल हे खरे. पण ती पद्धती सर्वथैव त्याज्य होय. ( इंडियन अँटिक्वेरी, खंड ८ वा आणि एपिग्राफिया इंडिका, खंड ६ वा, यात पुलकेशी - प्रशस्तीचे रविकीर्तीचे सर्व काव्य दिले आहे.)

माळव्यापर्यंत
 दुसऱ्या एका लेखात शेंडे यांनी, इ. सनाच्या बाराव्या शतकापर्यंत नर्मदेच्या उत्तरेस उज्जयनी माळवा प्रांतात, महाराष्ट्री भाषेतला शके १९३२ सालचा एक लेख सापडला आहे, तेथील हिंदी भाषेशी महाराष्ट्री व महाराष्ट्री अपभ्रंश यांतील रूपांचे व म्हणींचे साम्य आहे, इ. प्रमाणे देऊन महाराष्ट्राच्या सीमा त्या काळापर्यंत माळव्याच्या मध्यरेषेपर्यंत पसरल्या होत्या, असे म्हटले आहे. (विक्रमस्मृती, ग्वाल्हेर, पृ. ४६६ ) हीही प्रमाणे वरच्याप्रमाणेच अपुरी आहेत. केवळ महाराष्ट्रत्रयांचा उल्लेख यापेक्षा ती खूपच जास्त आहेत. पण तेथपर्यंत महाराष्ट्राचा विस्तार होता असे विधान करण्याच्या दृष्टीने ती अगदी अल्प आहेत.
 डॉ. वि. भि. कोलते यांनी याच ग्रंथात 'अपभ्रंशापासून मराठी निघाली' असा सिद्धान्त मांडला आहे व शेवटी अपभ्रंशाचे स्थान असलेली अवंती व तिच्या भोवतालचा परिसर हे मराठीचे माहेर मानायला हरकत नाही, असे म्हटले आहे. पण शेवटी - ऐतिहासिक दृष्टीने या विधानाची काटेकोर सत्यता अजून सिद्ध व्हावयाची आहे, असे नमूद करून ठेविले आहे.
 शं. बा. जोशी किंवा शं. रा. शेंडे यांचे विवेचन वाचताना एक विचार मनात येतो. वेदकाळापासूनच आर्य, द्रविड, नाग या जमाती एकत्र राहात होत्या. त्यांच्यांत वर्णसंकरही विपुल चालू होता. पुढे हेच लोक भिन्नकाळी दक्षिणेत उतरून गुजराथ, माळवा, महाराष्ट्र, कर्नाटक येथे स्थायिक झाले. द्रविड देशातील भाषा संस्कृताहून