पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/२९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२७३
मराठा सरदार
 

केले. तेव्हा श्रींनी साक्षात प्रसन्न होऊन सांगितले, 'विजापुरास जाऊन अंबरखान याची भेट घेणे. तो तुम्हांस इब्राहिम पातशहा जगद्गुरु यास भेटवील. दौलत अक्षयी होईल. चिंता नाही.' त्याप्रमाणे बावजी विजापुरास गेले. पातशहांनी त्यास सात लक्ष होनांची दौलत दिली. कुलगुरू परशुराम भट हे स्वारीत सदैव बावजीबरोबर असत. संकटप्रसंगी त्यास धीर देत व श्रींचा आशीर्वाद देऊन त्याचे कल्याण चिंतीत असत. बावजी यांचे पुत्र राजजी यांच्यावर परशुरामभट यांचे पुत्र वेदंभट यांची अशीच कृपा होती. वेदंभटांचे राजजींना हरकामात उत्कृष्ट साह्य असे. एकदा ते राजजींचा पठाण सावकार याच्याकडे, सात दिवस अन्न-पाण्यावाचून, कर्जफेडीसाठी ओलीस म्हणूनही राहिले होते.

मुस्लिम मौलवी
 तपस्वी, योगी, वेदवेत्ते ब्राह्मण आपल्या भक्तांना काय अशीर्वाद देत असत, कसे मार्गदर्शन करीत असत, हे वरील दोन तीन उदाहरणांवरून ध्यानी येईल. याच काळात मुस्लिम मुल्ला मौलवी, अवलिया, शेख हे आपल्या भक्तांना काय आशीर्वाद देत असत, ते पहाणे उद्बोधक होईल. हसन गंगू जाफरखान दिल्लीला एक सामान्य नोकर असताना तेथे शेख निजामुद्दीन या नावाचा एक अवलिया होता. एके दिवशी सुलतान महंमद तबलख त्याच्या दर्शनाला आला होता. तो परत गेला तेव्हा हसन लगेच तेथे आला. त्या वेळी निजामुद्दीन त्याला म्हणाला, 'हिंदुस्थानच्या एका प्रांताचा तू सार्वभौम होणार आहेस. मी जे तुला काही सांगत आहे ते विधिसंकेत म्हणूनच.' दक्षिणेत हसन आल्यावर शेख सिराज जुनैदी याच्याकडे तो गेला; तेव्हा त्याने त्याला उत्तेजन देऊन, 'राजाधिराज, तू सैन्य गोळा कर आणि जिहाद पुकारून, पाखंड्यांचा सर्व प्रदेश इस्लामच्या छायेखाली आण' असा शुभाशीर्वाद दिला आणि गुप्त धन दाखवून, मिरजेच्या किल्ल्यातल्या गुप्त बातम्या पुरवून, नाना प्रकारे साह्य केले. आणि तो किल्ला पडल्यावर, आता तुम्ही आक्रमण चालू ठेवा. विजयश्री तुमच्या बाजूला आहे' असा संदेशही त्याला दिला. सुलतान मुजाहिद याला शेख सिराजुद्दिन याचा असाच आशीर्वाद असे. तेव्हा मुस्लिम मौलवी, अवलिया यांची, आपल्या शिष्यांनी राज्य स्थापावे, सार्वभौम व्हावे, काफरांचा नाश करावा, इस्लामच्या छायेत जग आणावे, अशी प्रेरणा असे, असा आशीर्वाद असे, असे दिसते. (बहामनी राज्याचा इतिहास, डॉ. कुंटे, पृ. १, २६, २७, ३६.)

श्रींचा संदेश !
 या उलट मराठा सरदारांचे ब्राह्मण गुरू त्यांना कोणती प्रेरणा देत असत ते वर सांगितलेच आहे. या ब्राह्मणांच्या कृपेमुळे साक्षात श्रींचे दर्शन घाटगे यांना झाले आणि संदेश मिळाला की 'इब्राहिम आदिलशहाकडे जा. दौलत अक्षयी होईल.' श्रींनी १८