पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/१२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 हा ग्रंथ लिहिण्यास मी १९६८ साली प्रारंभ केला. 'वसंत' मध्ये ओळीने सात लेख आले. पण पुढे काही कारणाने खंड पडला. पण हाती घेतलेली इतर कामे संपल्यानंतर १९७५ साली जूनपासून मी पुन्हा 'वसंत'- मध्ये लेखन सुरू केले. १९७८ च्या ऑक्टोबरमध्ये शेवटचा लेख आला व ग्रंथ पुरा झाला. एवढी दीर्घ माला 'वसंत' मध्ये स्वीकारल्याबद्दल, माजी संपादकमित्र श्री. दत्तप्रसन्न काटदरे व सध्याचे संपादक श्री. बालशंकर देशपांडे यांचा मी ऋणी आहे.
 ग्रंथात प्रारंभापासून १९४७ पर्यंतचा महाराष्ट्राचा सांस्कृतिक इतिहास दिला आहे. तरी शेवटच्या विभागातील प्रकरणांत १९४७ नंतरच्या घटनांचा व भिन्न क्षेत्रांतील थोर स्त्री-पुरुषांचा निर्देश केलेला आहे. एखाद्या देशाचा नकाशा काढताना त्याच्या भोवतालचा काही भाग दाखवितात. तसेच हे आहे; पण हे फक्त निर्देश आहेत हे वाचकांनी कृपया ध्यानात ठेवावे. १९४७ नंतरचा इतिहास देण्याचा हेतू नाही, हे ध्यानात ठेवले की बरेचसे गैरसमज दूर होतील. हे निर्देश करताना क्वचित कोठे संक्षेप जास्त तर कोठे विस्तार जास्त असे झाले असेल, पण अगदी काटेकोर प्रमाण संभाळता येत नाही, हेच त्याचे कारण आहे; त्यात मुद्दाम कोठे भर द्यावा वा कोठे दुर्लक्ष करावे असा मनात हेतू नाही. त्यातूनही मूळ ग्रंथातल्याप्रमाणे या निर्देशातही काही महत्त्वाच्या व्यक्ती किंवा घटना यांचा उल्लेख राहून गेला असणे शक्य आहे. त्याविषयी मी एवढेच सांगू शकतो की, एकंदर ग्रंथातल्या त्रुटींकडे ज्याप्रमाणे, त्याचप्रमाणे याही त्रुटींकडे वाचकांनी उदार दृष्टीने पाहावे. कितीही प्रयत्न केले तरी दोष, उणीवा, चुका, प्रमादसुद्धा राहतातच, तसेच याही ग्रंथात राहिले असतील हे मी जाणतो. पण दोन हजार वर्षांचा महाराष्ट्राचा सांस्कृतिक इतिहास स्पष्टपणे ग्रंथात उभा राहिला आहे की नाही एवढे वाचकांनी पाहावे अशी माझी विनंती आहे.
 ग्रंथ साडेआठशे नऊशे डेमी पृष्ठांचा आहे. एवढी मुद्रिते तपासणे, प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे मला अगदी अशक्य होते. पण माझे मित्र डॉ. चंद्रशेखर बर्वे यांनी ते काम आनंदाने स्वीकारले व कसोशीने पार