पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/7

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्तावना. साहेबांनी केलेल्या इंग्रजी भाषांतरामध्ये शहाजहान याने जगन्नाथ यास पंडितराज ही पदवी दिली असे लिहिले असल्याचे समजते. जगन्नाथपंडित व अप्पयदीक्षित यांची काशी येथें गांठ पडली होती अशाविषयी आख्यायिका आहे; आणि अप्पयदीक्षित व रामदास यांची कावेरी नदीच्या तीरी आडवळे गांवीं इ. स. १६५५ साली भेट झाली असें काव्येतिहाससंग्रहांत आढळते. वामनपंडित यांनी जगन्नाथरुत गंगालहरीस्तोत्राचे मराठीत समश्लोकी भाषान्तर केले आहे. या स्तोत्राची पुष्कळ दिवस प्रसिद्धि व मान्यता असल्याशिवाय वामनासारख्या पंडिताने त्यास भाषांतराचा मान दिला असेल असे वाटत नाही. वामनपंडित इ. स. १६७३ साली वांईजवळ पांडववाडी येथे निवर्तले. रामदास, वामनपंडित, आणि तुकाराम शिवाजीमहाराजांच्या वेळेस होते हैं इतिहासांत नमूद आहे. शिवाजीमहाराजांचें पूर्ववय शहाजहानाच्या कारकीर्दीत आणि उत्तरवय औरंगजेबाच्या अमदानींत गेले. जगन्नाथाविषयी काही आख्यायिका प्रचलित आहेत. या ग्रंथाच्या शेवटी जोडलेल्या तिसऱ्या परिशिष्टांत जगनाथाचें चरित्र दिले आहे त्यांत त्याच्या संबंधाच्या आख्यायिका आल्या आहेत. सदर आख्यायिकांत तो अकबराच्या कारकीर्दीत होता असे आहे. अकबर याची कारकीर्द इ. स. १५५६ पासून इ.स १६०५ पर्यंत झाली. प्रसिद्ध वैयाकरणकेसरी भट्टोजिदीक्षित हे इ. स. १५७८ साली जन्मले. भट्टोजिदीक्षित आणि अप्पयदीक्षित यांचा परमस्नेह असून भट्टोजिदीक्षितांनी सिद्धान्तकौमुदी, प्रौढमनोरमा, वैयाकरणभूषण, शब्दकौस्तुभ इत्यादि स्वकृत ग्रंथांची आपल्या शिष्यप्रशिष्यमंडळीत व अन्यत्रही १ तिसरे परिशिष्ट पहा. २ कविचरित्र. ३ कविचरित्र. .