पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/46

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

महाराष्ट्र भामिनीविलास. मूल. लीलालुण्ठितशारदापुरमहासंपद्भराणां पुरो विद्यासद्मविनिर्गलत्कणमुषो वल्गन्ति चेत् पामराः। अद्य श्वः फणिनां शकुन्तशिशवो दन्तावलानां शशाः सिंहानां च सुखेन मूर्धसु पदं धास्यन्ति शालावृकाः॥७०॥ छाया. ज्यांनी सुंदर रत्नमंडित असें श्रीशारदेचे पुर लीलेने लुटिलें तयांसि जनि की विक्कारिती पामर ? । जाणा आज उद्यां जनी करितिल श्वा बॉलपक्षी शश सौक हरि, नींग, वारण, अहो! लत्तापहारें वश ॥७० ।। मूल. गीर्भिर्गुरूणां परुषाक्षराभिस्तिरस्कृता यान्ति नरा महत्वम् । अलब्धशाणोत्कषणा नृपाणां न जातु मौलौ मणयो वसन्ति ॥ ७१॥ छाया. नत्वे निजगुरुवाकप्रहार सोही तो मोठे पद मिळवी जगांत, पाहीं । यत्नाने निकष न घांसिलें जवास रत्ना त्या नृपतिशिरी घड़े न वास ॥ ७१ ।। १ भगवती सरस्वतीचे नगर. २ सहज. ३ कुत्रा. ४ पक्ष्याचें बालक. ५ ससा. ६ सहज. ७ सिंह. ८ सर्प. ९ हत्ती. श्वा, बालपक्षी, शश ( अनुक्रमें ) हरि, नाग, वारण, यांस लत्ताप्रहारें वश करितील इ. अन्वय. १० नम्रपणानें, गरीबीने. ११ आपल्या गुरूचे (उपदेशपर ) कठोर शब्द. १२ सहन करतो. १३ जोराने. १४ कसोटीवर.