पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/22

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

महाराष्ट्र भामिनीविलास. छाया. अंसिधारेसम तबि, कूरेभुजगेन्द्रतुल्य वैरि दिसती द्राक्षाहुनि गोड अधिक अंतरिं;जन थोर भूमि भूषविती।। १३॥ मूल. स्वच्छन्दं दलदरविन्द ते मरन्दं विन्दन्तो विदधतु गुञ्जितं मिलिन्दाः। आमोदानथ हरिदन्तराणि नेतुं नैवान्यो जगति समीरणात् प्रवीणः ॥१४॥ छाया. स्वच्छन्दै अलि लुटुनी तुझा मरन्द गावोत, स्मिर्तसरसीरुहा ! अमॅन्द । गंधातें तव विखरावया जगांत कोणीही नच पवनाविणें समर्थ ।। १४ ।। मूल. याते मय्यचिरान्निदाघमिहिरज्वालाशतैः शुष्कतां गंता के प्रति पान्थसंततिरसौ सन्तापमालाकुला। एवं यस्य निरन्तराधिपटलैर्नित्यं वपुः क्षीयते धन्यं जीवनमस्य मार्गसरसो धिग्बारिधीनां जनुः॥१५॥ छाया. माझी ही तनु चण्डभानुकिरणी ग्रीष्मी रुशा होइल संतापाकुल पांथसंहति तदा कोणाकडे पाहिल । १ तरवारीच्या धारेप्रमाणे. २ दुष्टसर्पश्रेष्ठासारखे. ३ वरून, दिसण्यांत. ४ आंतल्या बाजूला; अर्थात् मनाने किंवा स्वभावानें. ५ रस. ६ प्रफुल्लित कमळा !७ एकसारखें. ८ 'पवनाशिवाय शक्त' असें पाठान्तर. सूर्याच्या प्रखर किरणांनी. १० मोठ्या तापाने व्याकुळ.११ प्रवासी लोकांचा समुदाय..