पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/20

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

महाराष्ट्र भामिनीविलास. छाया. मी परम *नीच ऐसें समजुनि कूपा, करी न खेद मनीं । अतिसरसहृदय तेवीं असशी बहु चतुर परंगुणग्रहणीं ।।७।। मूल. कमलिनि मलिनीकरोषि चेतः किमिति बकैरबहेलितानभिज्ञैः । परिणतमकरन्दमार्मिकास्ते जगति भवन्तु चिरायुषो मिलिन्दाः ॥८॥ छाया. कमलिनि, बैंक हेलना करीती ह्मणुनि विषाँद धरीशि काय चित्ती ? । परिणतमकरन्दमर्मवेत्ते भ्रमर चिराँयु असोत भूतली ते ॥ ८ ॥ मूल. येनामन्दमरन्दे दलदरविंदे दिनान्यनायिषत । कुटजे खलु तेने हा तेने हा मधुकरेण कथम् ॥ ९ ॥ छाया. ज्याने रसपरिपूर्णप्रफुल्लकमलांत दिवस घालविले । मन त्याच मधुकराचें कुटजानें केविं आजि लोभविलें ॥ ९ ॥

  • अधम. ? अत्यंत प्रेमयुक्त अन्तःकरण ज्याचें असा. २ दुसयाच्या आंगचा गुण घेण्याविषयीं. नीच, रस, हृदय आणि गुण यांचे अनुक्रमें खोल, उदक, अन्तःप्रदेश आणि दोरखंड असे दुसरे अर्थ आहेत त्यांवरून श्लेष व्यक्त होईल. ३ बगळे. ४ अपमान. ५ खेद, दुःख. ६ परिपक्व रसाची खुबी जाणणारे. ७ पुष्कळ आहे आयुष्य ज्यांना असे.

८ जगत्मासिद्ध