पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/5

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

काममालामाप्रस्तावना - महाराष्टांतील किल्ल्यांचा हा दुसरा भाग तयार करण्याचा जो विचार माझे मनांत आला त्याचे सर्व श्रेय डेक्कन व्हरनॅक्युलर ट्रान्सलेशन सोसायटी व विशेषतः तिचे हु. शार, मेहनती, व दीर्घोद्योगी माजी सेक्रेटरी रावबहादुर विष्णु बाळकृष्ण सोहनी यांसच दिले पाहिजे. सोसायटीने या ग्रंथाच्या पहिल्या भागास दक्षिणा फंडांतून दोनशे रुपयांचे बक्षीस दिले आहे, व या भागास शंभर रुपयांचे बक्षीस दिले आहे. . या भागांत ठाणे व रत्नागिरी हे जिल्हे, व सावंतवाडी कोल्हापूर व सांगली ही संस्याने एवढ्या प्रदेशांतील किल्ल्यांची माहिती दिलेली आहे. या पुस्तकास मुख्य आधार क्यांबेल साहेब यांनी केलेल्या 'बॉम्बेय गॅझिटियर्स' नांवाच्या ग्रंथाचा आहे. तथापि या भागात दिलेल्या किल्ल्यांपैकी काही किल्ले विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यांतील किल्ले स्वतः पाहिलेले आहेत. जितकी माहिती मिळवितां आली तितकी मिळवून हा ग्रंथ तयार केलेला आहे. तथापि सुज्ञ वाचकांस एवढीच प्रार्थना आहे की, ज्यांच्या ज्यांच्या वाचण्यांत हा ग्रंथ येईल त्यांना यांत न दिलेली अशी जी काही माहिती माहीत असेल ती त्यांनी मेहरबानीनें ग्रंथकारास दिल्यास कदाचित् या ग्रंथाची पुनरावृत्ति काढण्याचा प्रसंग आलाच तर तिचा या ग्रंथांत मोठ्या आनंदाने समावेश केला जाईल. प्रत्येक किल्ल्याचे पायथ्याशी जाऊन तेथच्या लोकांपासून माहिती मिळवून . हा ग्रंथ लिहिला गेला असता तर तो अपूर्व झाला अगर गोष्ट सत्य आहे. परंतु मोठ्या दुःखाने असें ह्मणावें । वसई,