पान:महाराष्ट्राचे पंचप्राण.pdf/४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(२)

आयुष्याची राखरांगोळी होते. तेव्हां सांगावयाचे तात्पर्य है की हल्लींच्या भराभर प्रसिद्ध होणाच्या प्रेमकथापरिप्लुत कादंबऱ्या व नाटके हींच आपल्या तरुण पिढीच्या प्रत्यहीं दृग्गोचर होणाऱ्या शारीरिक व मान- सिक दौर्बल्यास कारण आहेत. ही आपली तरुण पिढी म्हणजे आपल्या राष्ट्राचे भावी आधारस्तंभ आहेत यामुळे जेणेकरून त्यांची ही वाईट अवस्था दूर होईल व त्यांची मनें व शरीरें सुदृढ व कर्तबगार होतील अशा उपायांचें अवलंबन केले पाहिजे. असे उपाय योजणें हें प्रत्येक राष्ट्रहित- चिंतकाचें पवित्र कर्तव्य आहे. हें पवित्र कर्तव्य अंशतः तरी आपण बजावावे असे आमच्या मनांत आलें. सोप्या व चटकदार भाषेत थोर व अनुकरणीय पुरुषांचीं छोटेखानी चरित्रें लिहिल्यास तीं आपल्या कोमल बाळांना व बालिकांना आवडतील व मग त्यांना सञ्चरित्रवाचमाचा नाद लागेल व कादंबरीवाचनाचें त्यांचें व्यसन सुटेल असे आमचे मनाने घेतले. याप्रमाणे चरित्रें लिहावीं असें मनांत येतांच आजच्या महाराष्ट्राला अत्यंत उपकारबद्ध करून ठेवणारे आज- कालचें उज्ज्वल विभूतिपंचक आमच्या डोळ्यापुढे उभे राहिले. या विभूतींनी आपले सर्व आयुष्य हल्लींच्या महाराष्ट्राच्या उन्नतीसाठीं खर्च केलें. यामुळे त्यांच्यावर हल्लींच्या महाराष्ट्राचें इतकें प्रेम जडलें कीं, या पांच विभूति म्हणजे आपले पंचप्राण आहेत असेंच या आमच्या महा. राष्ट्रास वाटत आहे. या पांच महा विभूतींनी आपलीं नाशवंत शरीरें टाकून दिलीं आहेत. यामुळे ह्या थोर पांच विभूति - हे थोर पांच देश- भक्त - हे महाराष्ट्राचे पंचप्राण, आपणाला सोडून गेले आहेत अशी आपली चुकीची समजूत झाली आहे. आणि याचमुळे आज आपला महाराष्ट्र मेल्यासारखा दिसत आहे. पण ही चूक आहे. देशाकरतां सर्व आयुष्य खर्च करणान्या विभूति मरत नसतात. अशा थोर विभूतींना म्हातारपणाची बाधा होत नाहीं. देवाप्रमाणे या थोर विभूति अजरामर होतात. फक्त आपली नाशवंत शरीरें टाकून देऊन मरणावर विजय संपादन करितात व आपल्या देशबंधूंच्या अंतःकरणांत प्रवेश करून