पान:महाराष्ट्राचे पंचप्राण.pdf/३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रस्तावना.
"Lives of great men all remind us
We can make our lives sublime"

Longfellow.

 मराठी भाषेंत आजकाल जर मोठी कोणती उणीव असेल तर बालवाङ्मयाची होय. सोप्या भाषेत लिहिलेलीं, वर्तनाला चांगलें वळण लावणारी, चटकदार व मधुर भाषेत बोध व रंजन करणारी, ब पौराणिक, ऐतिहासिक व आधुनिक अनुकरणीय थोर विभूतींची चरित्रें कथन करणारी, पुस्तकें आपल्या मराठी भाषेत फारच थोडर्डी आहेत. आज- काल जिकडे तिकडे कांदबया व नाटके यांचा सुळसुळाट झाला आहे. कांदबया व नाटकें किती झाली तरी काल्पनिक खण्या घडलेल्या गोष्टींनीं जसा मनावर परिणाम होतो तसा कल्पित कथांनीं होत नाहीं. यामुळे कोणत्याही वयांत कावया व नाटके यांच्या वाचनापेक्षां थोर पुरुषांचीं व स्त्रियांची चरित्रे वाचणें हें अधिक चांगले हे सांगावया- सच नको. बालवयांत तर कांदबऱ्या व नाटके यांच्यापेक्षां सद्वर्तन- प्रवर्तक नमुनेदार चरित्रेंच वाचनास अधिक योग्य. कादंबऱ्या अथवा नाटकें जरी चांगली असली तरी त्यांचेपासून नुसती करमणूक होते; यामुळे त्यांच्या वाचनांत जाणारा काळ फुकट जातो असेंच म्हटलें पाहिजे. ही गोष्ट झाली चांगल्या कादंब-यांची व चांगल्या नाटकांची. पण अलीकडे भराभर प्रसिद्ध होणाऱ्या कादंबऱ्यांकडे व नाटकांकडे नजर कल्यास असें दिसून येईल कीं, बहुतेक कांदबया व नाटकै युवयुव. तींच्या प्रेमकथांनीं ओथंबलेली असतात. अर्थातच कोमल बालकांच्या व बालिकांच्या मनांवर त्यांचा अतीशय वाईट परिणाम होतो व कधीं कधीं तर या बिचान्या कोमल बालकांच्या व बालिकांच्या शरीराची व