पान:महाराष्ट्रकाव्य मकरंद.pdf/71

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६८] महाराष्ट्रकाव्यमकरंद, [मोरोपंत पतिपरमेश्वरचरणा जी तत्सेवार्थ न नवशी करणे ती मुग्धा कैशी गे वळवील स्वामिमन वशीकरणे. (८) .. .. ... .. गुरुधिक्कारेंकरूनि पाप डसे. (९) घूको दृष्टीस नको सर्व जगत्तोषहेतु परि सवितो. (१०) खळबोधश्रम निष्फळ. (११) जाणति न सांगतां सुख असुख परांचे जगीं सदा सम जे. (१२) जयहेतु काय होइल अहिला बलयत्नकोटि केकि रणीं. मिरवे प्रकाश तिमिरी खद्योताचा, न तो टिक किरणी. (१३) जें कर्म धर्मशमंद त्यासचि संपादितो भला देहें. (१४) ज्या कर्मी योग्यत्व स्वामीचें तें न सेवकांनी की. (१५) . . . . . . . . . . दुर्बळी न कोपावें. (१६) दायादांचे दर्शन घ्यावें काशास ताप साधाया. (१७) दे धेनु दुग्ध धांउनि वत्सा; इतरां तदर्थ बळ लागे. (१८) शास्त्राभ्यास खरा गुरु समयीं रक्षी न मानसा चकवी. (१९) शिरतां पाताळबिळी दीपहि पावेल कां न रविमान? (२०) (धर्म म्हणे रे भीमा ) शरणागत रिपुहि रक्ष्य सन्महित. बा जरि घडेल भीता भय दान जगीं तरीच जन्महित. न सहावा अन्यकृत ज्ञातिपराभव बुधे उठा रचितो. जन्मुनि सुयशासि न जो जननीयौवनवनीं कुठारचि तो. १ घुबडाला. २ सूर्य. - - - -