पुस्तकात सांगितली आहे. तसेच 'इंडिया अंडर हर्ष' या युआन चुंग यांच्या पुस्तकाच्या प्रभावामुळे राजा हर्षाची राणी राजश्री ज्याप्रमाणे हर्षाच्या मागे बसून यात्रेकरूंशी चर्चा करत असे त्याप्रमाणे चिमणाबाईसुद्धा महाराजांशी संस्थानातील अनेक विषयांवर चर्चा करत होत्या. महाराणी नेहमी देशातील स्त्रियांच्या सामाजिक स्थितीबाबत विचार करत होत्या. देशातील स्त्रियांची स्थिती सुधारण्यासाठी त्यांनी अभ्यास करण्यास सुरुवात केली. स्त्रियांसंदर्भातील अनेक ग्रंथांचे वाचन त्यांनी केले होते.
महाराणींचा महाग्रंथ
१९११ मध्ये भारतीय स्त्रियांच्या स्थितीचे जगातील ७ खंडातील २९ देशांमधील स्त्रियांच्या स्थितीशी तुलना करून ‘The Position of Women in Indian Life' हा ग्रंथ लिहिला आहे. महाराणी चिमणाबाई लिखित हा भारतीय स्त्रियांना अर्पण केलेला ग्रंथ लंडनमधून प्रकाशित झाला होता. हा ग्रंथ म्हणजे सयाजीराव महाराजांच्या प्रेरणेने विकसित झालेल्या चिमणाबाईंच्या व्यक्तिमत्त्वाचा परमोच्च बिंदू होता. लंडन मधील फरगॉटन बुक्सने १९१२ मध्ये या ग्रंथाची दुसरी आवृत्ती काढली आहे. फरगॉटन बुक्सचे वैशिष्ट्य म्हणजे ते जगातील ऐतिहासिक आणि दुर्मिळ ग्रंथांचे कोणताही बदल न करता पुनर्मुद्रण करते. चिमणाबाईंच्या या पुस्तकाला फरगॉटन बुक्सने classical reprint series मध्ये निवडले आहे. यावरून या पुस्तकाचा ऐतिहासिक दर्जा लक्षात येतो.