महाराणी चिमणाबाई महिला पाठशाळा (१९२३)
१९२३ मध्ये बडोदा कॉलेजच्या एका खोलीत 'महाराणी चिमणाबाई महिला पाठशाळे'ची स्थापना करण्यात आली. या संस्थेने तब्बल ४० वर्षे स्त्रियांना देशी भाषेत शिक्षण देण्याचे कार्य केले. या पाठशाळेत तत्त्वज्ञान, समाजशास्त्र, मानसशास्त्र, जीवशास्त्र, आरोग्यशास्त्र इ. स्त्रियांना उपयुक्त ठरणारे महत्त्वाचे विषय देशी भाषांतून शिकविले जात होते. पाठशाळेकडून विद्यार्थिनींना G.A.(ग्रॅज्युएट इन आर्ट्स) ही पदवी दिली जात असे. त्याचबरोबर या पाठशाळेत पदव्युत्तर शिक्षणाचीही सोय करण्यात आली होती. विद्यार्थिनी P.A. ही पदवी इंग्लिशमधूनही घेऊ शकत होत्या. या P.A. च्या पदवीला बॉम्बे युनिव्हर्सिटीच्या M.A. या पदवीचा दर्जा होता. महाराणी चिमणाबाई महिला पाठशाळेस चिमणाबाईंकडून ६,००० रु. वार्षिक अनुदान दिले जात होते. ही रक्कम आजच्या रुपयात १ कोटी ४३ लाखांहून अधिक भरते.
महाराणी चिमणाबाई प्रसूतिगृह आणि शिशुकल्याण संस्था (१९२३)
सयाजीरावांच्या दृष्टीने भावी पिढीचे संगोपन करणाऱ्या स्त्रियांचे उत्तम आरोग्य हे निरोगी राष्ट्राचा पाया होता. त्यामुळेच सयाजीरावांनी आपल्या आरोग्यविषयक धोरणात स्त्रियांच्या आरोग्यविषयक सुधारणांना अग्रक्रम दिला होता. स्त्रिया आपल्या आरोग्याच्या समस्या महिला डॉक्टरांना जास्त मोकळेपणाने