पान:महाराजा सयाजीराव - स्त्रीविषयक कार्य.pdf/१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

इंदिराराजेंचा मराठा - आदिवासी विवाह
 महाराज प्रत्येक सुधारणेची सुरुवात स्वतःपासून आणि राजवाड्यापासून करत होते. याचे उदाहरण म्हणजे त्यांची कन्या इंदिराराजे यांनी स्वतः ठरवून केलेला मराठा - आदिवासी विवाह होय. महाराष्ट्राला शाहू महाराजांच्या प्रेरणेने शाहू महाराजांच्या जनक घराण्यातील चुलत बहिणीचा इंदूरच्या होळकरांबरोबर १९२४ मध्ये झालेला मराठा-धनगर हा आंतरजातीय विवाह माहीत आहे. परंतु शाहू महाराजांना या आंतरजातीय विवाहाची प्रेरणा देणारा त्याअगोदर ११ वर्षे १९९३ ला झालेला राजघराण्यातील पहिला मराठा-आदिवासी आंतरजमातीय विवाह महाराष्ट्राला माहीत नाही. असा विवाह सयाजीरावांची कन्या इंदिराराजे यांनी कूचबिहार या आदिवासी संस्थानातील राजकुमार जितेंद्र नारायण यांच्याशी स्वत:च ठरवून केला होता.
संस्थात्मक कार्य

 स्त्रियांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी सयाजीरावांनी महाराणी चिमणाबाईंच्या नेतृत्वाखाली बडोद्यात विविध संस्था केल्या. स्त्रियांचा सामाजिक संपर्क वाढावा यासाठी ३ मार्च १९०३ रोजी 'चिमणाबाई लेडीज क्लब'ची स्थापना करण्यात आली. अशा प्रकारचा भारतातील हा पहिला क्लब होता. या क्लबच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील बुद्धिमान स्त्रियांमध्ये होणारा परस्पर संवाद हा बडोद्यातील स्त्रीशिक्षणाच्या प्रगतीचा महत्त्वाचा टप्पा होता. मध्यमवर्गीय कुटुंबातील स्त्रियांचा दृष्टिकोन

महाराजा सयाजीराव : स्त्रीविषयक कार्य / १७