पान:महाराजा सयाजीराव - कृतीशील सत्यशोधक.pdf/२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

फुल्यांचे पहिले समर्थक
 फुल्यांच्या मृत्यूनंतर बडोद्यातील 'बडोदावत्सल' या सत्यशोधकी विचाराच्या साप्ताहिकाने ७ डिसेंबर १८९० मध्ये लिहिलेल्या मृत्युलेखात फुल्यांचे समग्र वाङ्मय प्रकाशित करण्याची मागणी सर्वप्रथम केली होती. पुढे ७९ वर्षांनी १९६९ मध्ये महाराष्ट्र शासनाने फुल्यांचे समग्र वाड्.मय प्रकाशित केले. १८९२ मध्ये 'बडोदा वत्सल'ने सावित्रीबाईंचा भाषणसंग्रह प्रकाशित केला. फुल्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे स्मारक झाल्यास त्याला आर्थिक मदत करण्याची सयाजीरावांनी तयारी दर्शवली होती. परंतु तसे प्रयत्न न झाल्याने तो विषय तेथेच थांबला. पुढे 'सत्यप्रकाश' हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र प्रकाशित करण्याची योजना पुढे आल्यानंतर त्याला मदत करण्याची भूमिका सयाजीरावांनी घेतली होती.

 ज्याप्रमाणे निरक्षर सावित्रीबाईंना महात्मा फुल्यांनी शिक्षण देऊन शिक्षिका म्हणून तयार केले त्याचप्रमाणे सयाजीरावांनी त्यांच्या पत्नी महाराणी चिमणाबाई ज्या विवाहापर्यंत निरक्षर होत्या त्यांना शिक्षण दिले. पुढे चिमणाबाईंनी १९११ मध्ये 'The Position of Women In Indian Life' हा संशोधनात्मक ग्रंथ इंग्रजीत लिहिला जो लंडनमधून प्रकाशित झाला. विशेष म्हणजे सर्व खंडातील स्त्रियांच्या दर्जाचा प्रत्यक्ष फिरून व १०० संदर्भ ग्रंथांचा आधार घेऊन लिहिला गेलेला तो जगातील आजअखेरचा एकमेव ग्रंथ आहे. फुले सयाजीरावांना आपला

महाराजा सयाजीराव: कृतीशील सत्यशोधक / २२