पान:महाराजा सयाजीराव - कृतीशील सत्यशोधक.pdf/१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कायद्याचा उल्लेख न करता का असेना, आपल्या १९३६ च्या जगप्रसिद्ध 'Annihilation of Caste' या न झालेल्या प्रकाशित भाषणात त्यांचा स्वतःचा धर्मसुधारणेचा कार्यक्रम म्हणून असताना जशीच्या तशी वापरण्याचा मोह फुल्यांचे महत्तम शिष्य बाबासाहेबांनासुद्धा आवरता आला नाही. यातच या कायद्याचे वैश्विक 'अनन्यत्व' सिद्ध होते.
 १९११ मध्ये महाराजांनी पुजारी आणि पुराणिक यांच्यासाठी परीक्षा घेण्याचा आदेश दिला. नोव्हेंबर १९१२ ला या कायद्याच्या अनुषंगाने पहिली पुरोहित परीक्षा घेण्यात आली. २२ मे १९१३ ला हिंदू पुरोहित बिल प्रसिद्ध झाले. १९९३-१९१४ मध्ये धारा सभेच्या दुसऱ्या सत्रात या बिलावर चर्चा करण्यात आली आणि यावर लोकांचे मत जाणून घेण्यासाठी वेळ वाढवून देण्यात आला. अशाप्रकारे लोकांच्या प्रतिक्रिया विचारात घेऊन या कायद्यात दोन वेळा दुरुस्त्या केल्या आणि ३० डिसेंबर १९१५ साली हिंदू पुरोहित कायदा बडोदा जिल्ह्यात लागू केला. या कायद्याचा मुख्य उद्देश धार्मिक विधी योग्य पद्धतीने व्हाव्यात आणि त्यांचा खरा अर्थ यजमानांना कळून यजमानांचा पूजेमागील आध्यात्मिक हेतू साध्य व्हावा हा होता.

 पुढे १४ सप्टेंबर १९३४ ला हा कायदा संपूर्ण संस्थानात लागू करण्यात आला. या कायद्यानुसार हिंदू पुरोहित परीक्षा, याज्ञिक विषयातील किंवा श्रावण मास दक्षिणा परीक्षा यापैकी कोणत्याही परीक्षेत पास झाल्यास किंवा संस्थानाकडून विशेष

महाराजा सयाजीराव: कृतीशील सत्यशोधक / १७