पान:महाराजा सयाजीराव - कृतीशील सत्यशोधक.pdf/१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

म्हस्के यांच्या डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशनच्या शिष्यवृत्तीवर शिकले. त्यांना सयाजीरावांनी बडोद्यात नोकरीस येण्याची सूचना केली होती. सत्यशोधक कर्मवीर भाऊराव पाटील यांनासुद्धा रयत शिक्षण संस्थेची प्रेरणा सयाजीरावांकडून मिळाली होती हे त्यांनी स्वतःच नोंदवून ठेवले आहे. सत्यशोधक जागृतीकार पाळेकर बडोद्यात 'जागृती' वर्तमानपत्र यशस्वीपणे चालवत होते.
पुरोगामी चळवळीचा तारणहार : सयाजीराव

 वरील सर्व नामावली विचारात घेता फुल्यांच्या सत्यशोधक संस्कारात घडलेली ही सर्व महत्त्वाची मंडळी सयाजीरावांकडून ' उपकृत' झालेली होती. सयाजीरावांनी सर्व विचारधारांना राजाश्रय दिला असला तरी सत्यशोधक आणि बौद्ध विचाराचे लोक हे सयाजीरावांसाठी सर्वात जवळचे होते याचे स्पष्ट पुरावे मिळतात. सयाजीरावांच्या एकूण चिंतनात तुलनात्मक विचारपद्धतीला महत्त्वाचे स्थान होते. फुल्यांचा टोकाचा नकारात्मक विद्रोह मूलभूत सकारात्मक धर्म साक्षरतेत रुपांतरित करण्याचे अत्यंत क्रांतिकारक काम सयाजीरावांनी तुलनात्मक धर्मचिंतनाच्या आपल्या व्यासंगातून केले होते. यावर वेळीच प्रकाश पडला असता तर सत्यशोधक चळवळीचे पुढे फुल्यांनंतर ब्राह्मणेतर चळवळीत रुपांतर होत असताना झालेले 'जातीयकरण' टाळता आले असते. परिणामी आज पुरोगामी चळवळीचे झालेले 'विषारीकरण' टळले असते. पुरोगामी चळवळ 'संवादी' आणि

महाराजा सयाजीराव : कृतीशील सत्यशोधक / १३