पान:महाराजा सयाजीराव - आरोग्य आणि व्यायामविषयक कार्य.pdf/२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

महाराजांच्या आज्ञेनुसार बी. ए. मध्ये शिकणाऱ्या रा. वामनराव चिंतामण तवकर यांनी लिहिलेला 'शारीरिक शिक्षणाचा -हास व तो थांबविण्याचे उपाय' हा निबंध सयाजीरावांना प्रचंड आवडला. यावेळी महाराजांनी त्यांना ५०० रु. बक्षीस दिले. तर १९२३-२४ मध्ये शारीरिक शिक्षण आणि संस्कृतीवरील २ नियतकालिकांचे प्रकाशन करण्यात आले.
 ग्रंथ प्रकाशनाबरोबरच जगभरातील तज्ञ व्यक्तींच्या व्याख्यानांद्वारे जनतेची आरोग्यविषयक साक्षरता वाढवण्यावर सयाजीरावांनी जाणीवपूर्वक भर दिला. जागतिक व्यायामतज्ञ युजेन सँडो यांच्या १९०४ मधील भारत भेटीवेळी महाराजांनी त्यांना बडोद्यास बोलावून त्यांचे बडोदा कॉलेजमध्ये ४५ मिनिटांचे व्याख्यान आयोजित केले होते. या व्याख्यानासाठी सयाजीरावांनी सॅडो यांना ४,५०० रु. मानधन दिले. आजच्या रुपयाच्या मूल्यात ही रक्कम १ कोटी २५ लाख रु. हून अधिक भरते.
भारताच्या क्रीडा क्षेत्राला योगदान

 सयाजीरावांनी आपल्या कारकीर्दीत केलेल्या या रचनात्मक प्रयत्नांची फळे स्वतंत्र भारताला चाखायला मिळाली. भारतीय क्रिकेट संघाचे माजी यष्टीरक्षक किरण मोरे व आघाडीचे फलंदाज बडोद्याच्या राजघराण्यातील अंशुमन गायकवाड यांसारखे खेळाडू बडोदा भूमीत घडले. क्रिकेटमधून भालाफेकीकडे वळलेल्या रजिया शेखने सुरुवातीला बडोदे, गुजरात, भारत

महाराजा सयाजीराव : आरोग्य आणि व्यायामविषयक कार्य / २८