पान:महाराजा सयाजीराव - आरोग्य आणि व्यायामविषयक कार्य.pdf/२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

स्त्रियांच्या आरोग्यशाळा
 स्त्रियांच्या आरोग्याकडे नेहमीच दुर्लक्ष झाल्याचे वास्तव आपण जाणतो. आजही राष्ट्राची अर्धी शक्ती असणाऱ्या या स्त्रियांच्या आरोग्याचा फारसा विचार केला जात नाही. परंतु सयाजीराव मात्र समाजाच्या विकासात पुरुषांच्या बरोबरीने योगदान देणाऱ्या या स्त्रियांच्या आरोग्य संवर्धनासाठी आयुष्यभर प्रयत्नरत राहिले. १८८५ मध्ये सयाजीरावांनी बडोद्या स्त्रियांसाठी स्वतंत्र व्यायामशाळेची स्थापना केली. स्त्रियांसाठी स्वतंत्र व्यायामशाळा सुरू करणारे बडोदा हे भारतातील पहिले संस्थान ठरावे. पुढे १९९५ मध्ये कन्या आरोग्य मंदिर संस्थेची सुरुवात करण्यात आली. बडोद्यात पुरुष संघाप्रमाणे महिलांचेही खेळाचे संघ बनवण्यात आले. बडोद्यात महिलांना खो-खो, थो बॉल, अॅथलेटिक्स, कबड्डी अशा अनेक खेळांचे प्रशिक्षण दिले जात होते. कन्या आरोग्य मंदिरामध्ये मुलींना लाठी, लेझीम, जोडी आसने, फरिगदका, भाला, हातापायाचे व्यायाम, जंबिया इ. आरोग्यवर्धक खेळ शिकविले जात.
देशी खेळांना प्रोत्साहन

 पाश्चिमात्य खेळांबरोबरच भारतीय खेळांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने सयाजीरावांनी 'हिंद विजय जिमखाना' या क्रीडा संघटनेची स्थापना केली. हिंदविजय जिमखान्याला भारतीय ऑलिंपिक असोसिएशनने स्वतंत्र मान्यता दिली. हिंद विजय जिमखान्याच्या माध्यमातून बडोद्यात दरवर्षी अखिल

महाराजा सयाजीराव : आरोग्य आणि व्यायामविषयक कार्य / २३