पान:महाराजा सयाजीराव - आरोग्य आणि व्यायामविषयक कार्य.pdf/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ऑक्टोबर १९३१ मध्ये मुंबई विद्यापीठातर्फे पाचगणी येथे तीन आठवड्यांच्या शारीरिक प्रशिक्षण कॅम्पचे आयोजन केले होते. या कँपमध्ये बडोदा कॉलेजच्या प्रो. मुखर्जी यांच्यासह २१ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. तर एका विद्यार्थ्याचा 'उत्कृष्ट कामगिरीसाठी पदक देऊन सत्कार करण्यात आला. मद्रास येथे शारीरिक शिक्षणाचे प्रशिक्षण घेतलेल्या एम. एम. उपाध्याय यांची शारीरिक शिक्षक म्हणून नियुक्ती केली. १९३२-३३ मध्ये प्रथम वर्षाबरोबरच मध्यवर्ती कला आणि विज्ञान वर्गांना शारीरिक प्रशिक्षण सक्तीचे करण्यात आले.

 महिला व पुरुष प्रशिक्षण कॉलेजमधील विद्यार्थांकडून भावी क्रीडा शिक्षकांची कामगिरी उत्तमरीत्या पार पाडली जावी म्हणून त्यांच्यासाठी शारीरिक शिक्षकांची नेमणूक करण्यात आली. १९२३-२४ मध्ये महिला प्रशिक्षण कॉलेजमधील विद्यार्थिनींना शारीरिक शिक्षणाचे प्रशिक्षण देण्यासाठी शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक मिस. जे. ए. मॅकडोनाल्ड यांच्या देखरेखीखाली प्रशिक्षण घेतलेल्या महिला शिक्षिकेची नेमणूक करण्यात आली होती. तर मद्रासमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या पदवीधारक शिक्षकांनी पुरुष प्रशिक्षण कॉलेजमधील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले.

महाराजा सयाजीराव : आरोग्य आणि व्यायामविषयक कार्य / २१