पान:महाराजा सयाजीराव - आरोग्य आणि व्यायामविषयक कार्य.pdf/१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



मोठी रुग्णालये व ३० लहान दवाखाने कार्यरत होते. तर १९३९- ४० यावर्षी बडोदा संस्थानात एकूण ११७ वैद्यकीय संस्था कार्यरत होत्या.
दुर्बल व दुर्लक्षित घटकांचे आरोग्य
 महाराजांनी समाजातील दुर्बल आणि दुर्लक्षित घटकांच्या आरोग्यासाठी अनेक प्रयत्न केले. सयाजीरावांनी १८९० मध्ये असूया येथे कुष्ठरोग्यांचे रुग्णालय सुरू करून कुष्ठरोग्यांच्या उपचाराचा मार्ग आखला. त्याचबरोबर १९११ ला कृष्ठरोग्यांसंबंधी कायदा करण्यात आला. २८ जून १८९८ ला बडोदा येथे वेड्यांचे रुग्णालय सुरू केले. यावर्षी रुग्णालयात १६ रुग्ण दाखल झाले तर रुग्णालयावर एकूण १,४४२ रुपये खर्च झाला. समाजातील अंध व्यक्तींवर उपचार करण्यासाठी बडोद्यातील 'श्री. सयाजी जनरल हॉस्पिटल' मध्ये स्वतंत्र नेत्र विभागाची सुरुवात महाराजांनी केली. या नेत्र विभागात रुग्णांच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया केल्या जात होत्या. सयाजीराव महाराजांच्या बडोदा संस्थानातील आरोग्य व्यवस्थेच्या सार्वत्रिकीकरणाचा हा उत्तम पुरावा आहे.

 वैद्यकीय क्षेत्रातील पुस्तकांसाठी १८७९-८० ला वैद्यकीय ग्रंथालयाची स्थापना केली. त्यामुळे वैद्यकीय खात्याच्या कर्मचाऱ्यांना मौल्यवान संदर्भ ग्रंथांची सहज उपलब्धता झाली. ग्रंथालयात ४ वैद्यकीय नियतकालिके व दैनिके होती. १८८८ अखेर या वैद्यकीय ग्रंथालयात १,६६३ संदर्भ ग्रंथ उपलब्ध होते. १९०७ ला वैद्यकीय विभागाच्या कामकाजात सुधारणा

महाराजा सयाजीराव : आरोग्य आणि व्यायामविषयक कार्य / १०