पान:महाराजा सयाजीराव आणि हिंदू कोड बिल.pdf/७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 विविध धर्मांच्या तुलनात्मक अभ्यासातून मानव कल्याणाचे ‘सार’ आत्मसात के लेले सयाजीराव महाराज आपल्या ससं ्थानातील स्त्रियांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी आयुष्यभर प्रयत्नरत राहिले. भारतीय स्त्रियांच्या मुक्तीचे ‘प्रवेशद्वार’ मानल्या गेलेल्या हिंदू कोड बिलाच्या अंमलबजावणीसाठी करण्यात आलेले प्रयत्न आपण सर्व जाणतोच. फेब्रुवारी १९४९ पासनू ते नोव्हेंबर १९५१ पर्यंत म्हणजे जवळजवळ दोन वर्षे घटना समितीत हिंदू कोड बिलावर वादळी चर्चा झाली. या बिलाला पाठिंबा मिळत नाही हे समजल्यावर याचा निषेध म्हणून नोव्हेंबर १९५१ ला बाबासाहेबांनी कायदा मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर गेली ६०-७० वर्षे भारतातील स्त्रीवादी चळवळ या बिलाच्या सपं ूर्ण अंमलबजावणीसाठी सघं र्ष करत आहे. परंतु सयाजीराव महाराजांनी १९०५ पासनू च आपल्या बडोदा ससं ्थानात हिंदू कोड बिलातील कायद्यांची अंमलबजावणी सरू के ली होती. हा इतिहास दुर्दैवाने आपल्याला माहीत नाही.
 १९०५ ते १९३३ या कालखंडात सयाजीरावांनी बडोद्यात अंमलबजावणी के लेले हिंदू कोड बिल समजून घेण्याआधी भारतातील हिंदू कोड बिलासदं र्भातील सर्व प्रयत्नांचा आढावा घेणे आवश्यक आहे. कारण पुरोगामी महाराष्ट्रात इतर अनेक बाबींप्रमाणेच हिंदू कोड बिलाबाबत अतिशय वरवरची आणि

अत्यंत त्रोटक स्वरूपाची चर्चा झाली आहे. त्यामुळे १९१९ ते१९५१ या कालखंडातील सर्व घटना जोडून अभ्यासल्यानंतर

महाराजा सयाजीराव आणि हिंदू कोड बिल / ७