पान:महाराजा सयाजीराव आणि सावित्रीबाई फुले.pdf/७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अभ्यासत असताना जात ही संकल्पना तटस्थपणे आणि वस्तुनिष्ठपणे समजून घेतल्याशिवाय भारतीय समाजातील अंतर्विरोध आणि समस्या यांचे परिपूर्ण आकलन केवळ अशक्य ठरते. महत्त्वाचे म्हणजे जातीची गुलामगिरी आणि स्त्रीदास्य या दोन संकल्पनासुद्धा स्वतंत्रपणे अभ्यासता येत नाही एवढ्या त्या एकरूप आहेत.
 ब्रिटिशांमुळे या प्रश्नांच्या अभ्यासाला चालना मिळाली. या सत्तेबरोबर आलेले युरोपियन आणि अमेरिकन ख्रिश्चन धर्मप्रसारकांमुळे हिंदू धर्मसुधारणेचा मार्ग मोकळा झाला. फुले हे या सर्व बौद्धिक वातावरणात विकसित झालेले भारतातील सर्वात क्रांतिकारक सुधारक मानले जातात. कारण जात आणि स्त्रीदास्य यांची एकत्रित आणि पथदर्श मांडणी फुल्यांनी केली. सयाजीराव महाराजांनी ज्या तऱ्हेने फुल्यांच्या तत्त्वज्ञानात्मक मांडणीला विचार आणि कृतीची जोड दिली ती पाहता फुले विचाराचे विकासक म्हणून ते महत्त्वाचे ठरतात. सयाजीरावांनी फुल्यांना महात्मा ही पदवी देण्याची सूचना सत्यशोधकांना केली तर फुल्यांनी आपल्या बैठकीच्या खोलीत आपला आदर्श म्हणून सयाजीरावांचा फोटो लावला होता.
फुले : भारतातील स्त्री शिक्षणाचे प्रवर्तक

 शिक्षण हा सामाजिक सुधारणेला चालना देणारा महत्त्वपूर्ण घटक आहे. भारतातील हु 'समाजाच्या अधोगतीचे प्रमुख कारण निरक्षरता हे होते. पारंपरिक भारतीय समाजव्यवस्थेने

महाराजा सयाजीराव आणि सावित्रीबाई फुले / ७