पान:महाराजा सयाजीराव आणि सावित्रीबाई फुले.pdf/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराजा सयाजीराव
आणि
सावित्रीबाई फुले

 ब्रिटिशांचे भारतातील आगमन हे प्रबोधन आणि आधुनिकीकरणाचे प्रमुख कारण होते. भारत ब्रिटिशांमुळे गुलाम झाला असे आपण म्हणतो. परंतु ब्रिटिशांच्या आगमनापूर्वी २,००० वर्षांहून अधिक काळ भारतात अस्तित्वात असणारी धार्मिक आणि सांस्कृतिक गुलामगिरी मात्र आपण फारशी गंभीरपणे घेत नाही. जात नावाची व्यवस्था ही गुलामगिरी अबाधित ठेवण्यासाठी अतिशय सूत्रबद्धपणे कार्यरत होती. या व्यवस्थेच्या माध्यमातून हिंदू समाजव्यवस्थेचे २,५०० जातींमध्ये तुकडे झाले. प्रत्येक जात उच्च-नीचतेच्या मानसिक दबावाखाली इतरांचा द्वेष करण्यामध्ये गुंतवून ठेवण्यात आली. या व्यवस्थेमध्ये सर्वाधिक लाभ ब्राह्मण या संख्येने कमी असणाऱ्या तसेच जातिव्यवस्थेच्या सर्वोच्च स्थानी असलेल्या जातीला मिळत होते. या अत्यंत गुंतागुंतीच्या रचनेने विषमतेचे, शोषणाचे आणि गुलामगिरीचे जे प्रारूप विकसित केले त्याला जगाच्या इतिहासात तोड नाही. म्हणूनच भारतीय समाजव्यवस्था

महाराजा सयाजीराव आणि सावित्रीबाई फुले / ६