पान:महाराजा सयाजीराव आणि सावित्रीबाई फुले.pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

(१९०५), मुला-मुलींसाठी मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण कायदा (१९०६), विशेष विवाह कायदा (१९०८), हिंदू घटस्फोट कायदा (१९३१), हिंदू स्त्रियांना संपत्तीतील हक्क कायदा (१९३३), स्त्रियांना मतदानाचा अधिकार, सरकारी नोकरीत स्त्रियांना प्रवेश असे हे भारतातील ५६५ संस्थानांमध्ये बडोदा संस्थानने केलेले पहिले व प्रागतिक कायदे आहेत.
 हा सर्व इतिहास विचारात घेता सयाजीरावांचे स्त्रीविषयक कार्य हे भारतातील स्त्री सक्षमीकरणाच्या इतिहासातील मैलाचा दगड असल्याचे सिद्ध होते. आपला वैभवशाली अज्ञात इतिहास समजून घेण्याचा आनंद सयाजीरावांच्या स्त्रीविषयक कामातून मिळतो त्याचबरोबर या सगळ्यातून व्यक्त होणारा सयाजीरावांचा दृष्टिकोन आजच्या स्त्री-पुरुषांना आपल्या स्त्री विषयक दृष्टिकोनाच्या दुरुस्तीसाठी सर्वात आदर्श पर्यायसुद्धा देतो.
सावित्रीबाईंना आर्थिक पाठबळ

 १८९० मध्ये फुलेंच्या मृत्यूनंतर सावित्रीबाई आणि यशवंत यांना अत्यंत हलाखीत दिवस काढावे लागत होते. मामा परमानंदांच्या विनंतीवरून महाराजांनी सावित्रीबाईंच्या मदतीसाठी धामणस्करांच्या हस्ते एक हजार रुपयांचा चेक पाठवून दिला. मामांचे स्नेही तुकाराम तात्या भागीदार असणाऱ्या एस. नारायण कंपनीत हा चेक ठेवून त्या रकमेच्या व्याजातून दर तिमाहीस सावित्रीबाईंना ५० रु. मदत मिळण्याची

महाराजा सयाजीराव आणि सावित्रीबाई फुले / १६