पान:महाराजा सयाजीराव आणि सहकार चळवळ.pdf/४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बडोदा संस्थानातील सहकारी संस्थांचे प्रकार

 सयाजीरावांच्या सहकार चळवळीची प्रेरणा ही युरोपातील डेन्मार्क, जर्मनी, हॉलंड, इटली या देशातील सहकार चळवळीची होती. सयाजीरावांचे ठाम मत होते की सामाजिक व आर्थिक सुधारणा ग्रामीण भागातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत जर पोहोचविण्यासाठी सहकारी चळवळीचे माध्यम सर्वात प्रभावी आहे. यासाठीच सयाजीरावांनी पुढील विविध प्रकारच्या सहकारी संस्था बडोदा संस्थानात सुरू आणि त्या उत्तमप्रकारे चालविल्यादेखील.

 १) अन्योन्य सहकारी मंडळी

 २) बँकिंग संघटना

 ३) पशुखाद्य साठवणूक संस्था,

 ४) धान्य साठवणूक संस्था

 ५) नागरी संस्था

 ६) विणकर संस्था

 ७) चर्मकार संस्था

 ८) अंत्योज संस्था

 ९) भंगी सहकारी संस्था

 १०) नाभिक 'पतपुरवठा संस्था

 ११) सरकारी कर्मचारी संस्था

 १२) न्यायिक विभाग कर्मचारी संस्था

 १३) शिक्षक सहकारी पतपुरवठा संस्था

महाराजा सयाजीराव आणि सहकार चळवळ / ४४