पान:महाराजा सयाजीराव आणि सहकार चळवळ.pdf/३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भारतातील विविध प्रांत व संस्थानांतील सहकारी संस्थांची आर्थिक स्थिती

 बडोदा संस्थानातील सहकारी संस्थांना ५,४१,००० रु. इतके शासकीय कर्ज देण्यात आले होते. या सहकारी संस्थांच्या उभारणीतील बडोदा सरकारचे धोरणात्मक आर्थिक पाठबळ यातून अधोरेखित होते. याचबरोबर बडोद्यातील सहकारी संस्थेच्या प्रत्येक सभासदामागील खेळते भांडवल मुंबई प्रांतानंतर सर्वाधिक १२७ रुपये प्रतिसभासद इतके होते. सहकारी संस्थांच्या माध्यमातून प्रत्येक सभासदाला पुरवल्या गेलेल्या आर्थिक पाठबळाचे हे निदर्शक आहे. त्रावणकोर व कोचीन या तत्कालीन प्रगत संस्थानांमध्ये सहकारी संस्थांच्या प्रत्येक सभासदामागील उपलब्ध खेळत्या भांडवलाचे प्रमाण अनुक्रमे २७ रु. व ५५ रु. इतके कमी होते. ही आकडेवारी १९३१-३२ मध्ये बडोदा संस्थानातील सहकारी संस्थांच्या माध्यमातून सभासदांना प्रदान केली गेलेली आर्थिक सक्षमता स्पष्ट करते.

भारतातील विविध प्रांत व संस्थानांतील कर्जपुरवठा

 १९३१ मध्ये म्हैसूर संस्थानात शासनाकडून सहकारी संस्थांना एकूण २,७४,८३१ रु. चे आर्थिक साहाय्य करण्यात आले. संस्थानातील कृषी आणि बिगरकृषी सहकारी संस्थांना पुरवण्यात आलेल्या अनुक्रमे १,२६,५६३ रु. व १,१७,१४५ रु. मदतीचा

महाराजा सयाजीराव आणि सहकार चळवळ / ३९