पान:महाराजा सयाजीराव आणि सहकार चळवळ.pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 १९३८-३९ दरम्यान दूध उत्पादनाच्या दृष्टीने या संस्था महत्त्वपूर्ण भूमिका बजावत होत्या. सयाजीरावांनी केवळ दूध उत्पादनाकडे लक्ष न देता जनावरांच्या आरोग्याकडेही विशेष लक्ष दिले. बडोद्यात एकूण ११ दुभत्या जनावरांच्या संस्था होत्या. या विभागातील सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, सयाजीरावांनी दूध उत्पादनाबरोबरच उच्च जातीच्या जनावरांच्या प्रजननावरदेखील लक्ष दिले. यातूनच दोन पशुसंवर्धन संस्थांची स्थापना करण्यात आली होती.

बडोदा संस्थानातील सहकारी कृषी बँका (पेढी)

 बडोद्यात कार्यरत असणाऱ्या कृषी संस्थांना आर्थिक मदत उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कृषी बँकांची स्थापना करण्यात आली. १९१७-१८ मध्ये अमरेली शेतकी बँक अमरेली जिल्ह्यातील कृषी सहकारी संस्थाना पतपुरवठा करीत होती. या कृषी बँकांच्या कामकाजावरील देखरेखीसाठी १९१८-१९ मध्ये बडोद्याच्या सहकार खात्याकडून १३ मानद आयोजकांची नेमणूक करण्यात आली होती. १९२२-२३ साली बडोदा संस्थानात भद्रन कृषी पेढी, रेल्वे कृषी पेढी, सोनगड कृषी पेढी, व्यारा कृषी पेढी या ४ कृषी बँका (पेढी) कार्यरत होत्या. या कृषी पेढ्यांमार्फत कृषी सहकारी संस्थांबरोबरच वैयक्तिक खातेदारांनादेखील पतपुरवठा केला जात होता.

महाराजा सयाजीराव आणि सहकार चळवळ / १६