पान:महाराजा सयाजीराव आणि सहकार चळवळ.pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बियाणे, गवारीचे बी-बियाणे आणि कपडे यांचे वितरण करण्यात आले. महाराजांनी आपल्या संस्थानातील सर्व घटकांच्या उन्नतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न केल्याचे लक्षात येते.

 १९३८-३९ दरम्यान बडोद्यात कापड उद्योग हा प्रमुख उद्योगांपैकी एक होता. त्यामुळेच संस्थानात १८ सहकारी कापूस विक्री संस्था कार्यरत होत्या. कापूस उत्पादकांच्या मालाला योग्य भाव मिळावा व त्याने उत्पादित केलेल्या कापसाची वेळेत विक्री व्हावी या दृष्टीने या कापूस विक्री संस्था फार महत्त्वाची भूमिका पार पाडत होत्या. कापूस विक्रीची जबाबदारी फक्त विक्री संस्थांवर पडू नये यासाठी सहकार खात्याने ग्रामीण भागातील संस्थांनासुद्धा कापूस विक्रीची जबाबदारी दिली.

दुभत्या जनावरांच्या संस्था

 १९२७-२८ मध्ये बडोदा संस्थानातील पाद्रा तालुक्यातील गावांमध्ये डेअरी व्यवसाय सुरू करण्याच्या हेतूने 'विशेष आर्थिक चौकशी समिती नेमण्यात आली होती. समितीच्या अहवालानंतर या वर्षी संस्थानात अशा प्रकारच्या २७ संस्थांची नोंदणी करण्यात आली होती. या संस्थांना सरकारतर्फे दीर्घ मुदतीची कर्जे देण्याची हमी देण्यात आली. परिणामी बडोदा सरकारकडून दहा दुभत्या जनावरांच्या संस्थांना २३ हजार ७०० रुपयांच्या कर्जाचे वाटप करण्यात आले.

महाराजा सयाजीराव आणि सहकार चळवळ / १५