कायमचे दिवाण पद सोडून गेल्यावर भाऊसाहेबांना ऑक्टोबर १९०१ ला दिवाण पद मिळाले. भाऊसाहेबांना दिवाण पद मिळाल्यामुळे संस्थानातील व संस्थानाबाहेरील इतर समंजस व्यक्तींना ही नेमणूक योग्यच वाटली परंतु काही उच्च जातीय लोकांना केवळ जातीमत्सरास्तव किंवा खाजगी द्वेषभावास्तव वाईट वाटले. अशाप्रकारे भाऊसाहेब तथा रामचंद्र विठोबा धामणस्कर आपल्या मेहनतीच्या, इमानदारीच्या, शिस्तीच्या, जोरावर रत्नागिरीच्या कचेरीतील कारकून, हेड क्लार्क, मामलेदार ते बडोदा संस्थानचे ७ वे दिवाण बनले. त्यांच्या या प्रवासामध्ये कधीही कामासंबंधाने वरिष्ठांकडून किंवा खुद्द महाराज सरकारांकडून यत्किंचितही ठपका किंवा दोष आढळून आला नाही. बडोदा संस्थानातील विविध प्रकारची बिकट व नाजूक कामे प्रामाणिकपणाने, दक्षतेने व तेवढ्याच संवेदनशीलतेने करून स्वामीकार्यनिष्ठा भाऊसाहेबांनी वेळोवेळी दाखवून दिली. म्हणूनच सयाजीराव महाराजांनी आपल्या राज्याचे सर्वोच दिवाणपद भाऊसाहेबांच्या हाती सोपवून एका सत्यशोधकाला खऱ्या अर्थाने न्याय दिला. अशा या महान सत्यशोधकाचा मृत्यू बडोदा संस्थानातील नवसारी येथे जून १९०६ मध्ये झाला.
सयाजीरावांनी आपल्या प्रशासनात सर्व जाती धर्माच्या लोकांचा समावेश जाणीवपूर्वक केला होता. कामातील तत्परता, प्रामाणिकपणा आणि महाराजांची ध्येय-धोरणे सामान्य लोकांपर्यंत घेऊन जाण्याची ताकद असणे हेच निकष
पान:महाराजा सयाजीराव आणि सत्यशोधक रामचंद्र धामणस्कर.pdf/२३
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराजा सयाजीराव आणि सत्यशोधक रामचंद्र धामणस्कर / २३