पान:महाराजा सयाजीराव आणि सत्यशोधक चळवळ.pdf/९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महात्मा फुले

टाकले. या कायद्यात त्यांनी १० वर्षे वयापर्यंतची मुले आणि ८ वर्षे वयापर्यंतच्या मुलींना शाळेत न पाठवणाऱ्या पालकांना प्रतिदिन एक रुपया दंडाची तरतूद केली होती. १९०६ च्या १ रुपयाचे आजचे मूल्य २५०० रु. भरते. हे वाचून आज आपण यावर विश्वास ठेवणार नाही. परंतु यातून शिक्षण हेच परिवर्तनाचे साधन आहे ही बाब महाराज किती गंभीरपणे घेत होते याचा साक्षात्कार होतो.
 या तरतुदीचा थेट संबंध १८८२ मधील फुलेंच्या हंटर कमिशनसमोरील मागणीशी आहे. कारण ही हंटर कमिशनसमोर मागणी करताना फुलेंनी पालकांना दंड करून त्यांच्याकडून जमा होणारा दंड बहुजनांच्या शिक्षणावर खर्च करण्याचीदेखील मागणी केली होती. ही बाब सयाजीरावांनी प्रत्यक्षात कृतीत आणली. फुलेंची मागणी आणि सयाजीरावांची कृती यांची तुलना केली असता फुलेंना गुरु मानणाऱ्या इतर सर्व समाजक्रांतिकारकांच्या सयाजीराव किती पुढे होते याचा पुरावा मिळतो. इतकी कृतिशीलता सयाजीरावांच्या नंतर एकाही फुले अनुयायाला प्रत्यक्षात आणता आली नाही.

 ‘शेतकऱ्याचा असूड' ग्रंथामध्ये महात्मा फुलेंनी मांडलेली भूमिका आणि अपेक्षा सयाजीरावांच्या शेतीविषयक कार्याशी जोडून समजून घेतली असता

महाराजा सयाजीराव आणि सत्यशोधक चळवळ / ९