पान:महाराजा सयाजीराव आणि सत्यशोधक चळवळ.pdf/३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 संपूर्ण नवीन माहिती मिळाली. एवढे वर्षे का संशोधन झालं नाही याचंही आश्चर्य वाटतं. हिरा बागेतील म्हस्के स्मारकास मात्र भेट घेण्याची इच्छा झाली. छान काम झालं आहे. - बावीसकर
 गंगारामभाऊ म्हस्के ई बुक मिळाले. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे ई बुक वाचले. महाराष्ट्रातील समाजसुधारकांना महाराजा सयाजीराव यांनी केलेल्या मदतीची माहिती आजवर कुठेही वाचनात आली नव्हती. आपण अतिशय प्रयत्नपूर्वक ही माहिती प्रकाशात आणली. छोट्या छोट्या पुस्तकरुपाने मराठी वाचकांना उपलब्ध करून दिली हे फार मोठे काम केले आहे. - ज्ञानेश्वर घोटेकर, येवला
 अतिशय नवीन व उद्बोधक माहिती आहे. गायकवाड महाराजांच्या दूरदृष्टीला, पुरोगामी विचारांना मानावे लागेल. हे ही खरे आहे की वेदांना व वेदोक्त पूजांना ब्राह्मणमुक्त करावे लागेल. महाराजांनी त्याबाबत आदर्शच घालून दिला आहे. त्याकाळच्या भारतातील संस्थानिकांच्या काळातील विविध धार्मिक सुधारणांचा अभ्यास नवीन संशोधकांनी करायला हवा. - श्याम कोरे
 धर्म साक्षरतेचा संदेश देणारे छान विश्लेषण. - डॉ. पी. जे. जोशी
 तुम्ही फारच मोठं आणि मोलाचं काम करताय. त्याबाबत मला मनापासून आदर आहे. - राजा दीक्षित
 तुम्ही खरोखर ग्रेट आहात ! तुमच्या जिद्दीला व परिश्रमांना सलाम !! - किशोर दीक्षित, वाई
 दिनेश पाटील यांचे अभिनंदन. उत्तम लिखाण. - अशोक चौसाळकर
 खूप ऐतिहासिक महत्त्वाचे कार्य आपण केले आहे, हे आधीच बातम्या वाचून कळले होते. तथापि टप्प्याटप्प्याने आपण PDF स्वरूपात तो सारा खजिना आमच्यापर्यंत पोचवत आहात, याबद्दल धन्यवाद द्यावेत तेवढे थोडेच आहेत. - आनंद हार्डीकर
 खरंच एक एक दैवी खजिना सापडावा त्याप्रमाणे नवनवी व अमूल्य माहिती, ज्ञान उलगडत आहे. हे खरंच अभ्यासाला, संशोधनाला चालना देणारे कार्य व उपक्रम निश्चितच आहे...!!! आपण महाराष्ट्राला व देशाला उपकृत केले आहे. - नवनाथ गोरे, औरंगाबाद

●●●