पान:महाराजा सयाजीराव आणि सत्यशोधक चळवळ.pdf/३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराजा सयाजीराव ज्ञानमालेवरील


काही निवडक अभिप्राय
 महाराजा सयाजीराव ज्ञानमालामधील पहिली माला दुपारी मिळाली. धन्यवाद. नुकतीच वाचून झाली आहे.... छत्रपती शिवाजी महाराज व सयाजीराव महाराज गायकवाड यांच्या कार्याची तौलनिक ओळख करून देण्यात आपण यशस्वी झाले आहात. अभिनंदन.-पुरुषोत्तम खेडेकर
 I have gone through the Sayajirao Gaikwad and Dr. Ambedkar. It is a good reading. I got you know many things which are new. Look forward to read other books also which I got. - सुखदेव थोरात
 You're doing a incredible work with Sayajirao Gaikwad. Ambedkar's unfulfilled aspiration to write a biography of the Maharaja seems to be coming true. Shout out if I can be of any help. Well, done!! - सूरज येंगडे
 स्त्रीसुधारणा व संघटनबाबत महाराणी चिमणाबाईंचा बराच मोठा सहभाग होता ही आतापर्यंत दडलेली माहिती यामुळे उजेडात आली. यापुढे नोंद घेणे जरुरीची राहील असे वाटते आणि ती घ्यायलाच हवी. हे सर्व काम अतिशय कल्पक आणि महाराजांच्या कर्तृत्वाचा विस्तारित परिचय करून देणारे आहे. या पुस्तिका मी अनेकांना पाठवतो. बऱ्याच लोकांना धक्का बसतो, हे वाचून. हे काम ऐतिहासिक आहे. - नंदकुमार मोरे
 तुम्ही फारच थोर काम करत आहात. मराठी जनता ऋणी राहील. बाबा,हे काम अतुलनीय आहे. - ज्ञानेश्वर मुळे
 बाबा आपलं कितीही अभिनंदन केलं तरी कमीच. सयाजी महाराजांच्या साठीच आपलं आयुष्य आहे असंच म्हणाव लागेल. - न्या. एम. जी.गायकवाड
 ही फार चांगली संग्राह्य सिरीज होतेय. - दिलीप चव्हाण, पुणे
 So very useful cultural documentation of a golden page in history. A lasting contribution. - गणेश देवी