पान:महाराजा सयाजीराव आणि श्रीधर व्यंकटेश केतकर.pdf/८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जात साक्षरता
 महाराजांनी जात साक्षरतेसाठी केलेल्या प्रयत्नांमध्ये जातीबद्दलची वस्तुनिष्ठ माहिती हिदू धर्मग्रंथातून भाषांतरित करून प्रकाशित करणे, जातीवरच्या वैज्ञानिक संशोधनाला चालना देणे याबरोबरच जातीबद्दलची सांख्यिकीय माहिती एकत्रित करून प्रकाशित करणे अशा सर्व प्रयत्नांचा समावेश होता. १८८६ मध्ये सयाजीरावांनी आपल्या राजवाड्यात होणाऱ्या धार्मिक कृत्यांचे शास्त्रार्थ सांगणारा 'ऐनेराजमेहेल' हा ग्रंथ शंकर मोरो रानडे, कृष्णदेव महादेव समर्थ आणि भाऊ मास्तर यांच्याकडून तयार करून घेतला. तर १८९२ मध्ये राजवाड्याच्या देवघरातील धार्मिक विधींच्या खर्चाचे १,००० पानांचे तपशीलवार बजेट छापून पुस्तकरूपात प्रसिद्ध केले.
धर्मचिकित्सक राजा

 २२ ते २६ सप्टेंबर १९०१ या दरम्यान बडोद्यात स्वामी हंसस्वरूप या उच्चशिक्षित हिंदू धर्मपंडितांची परंपरावादी हिदू धर्माचा पुरस्कार करणारी पाच व्याख्याने बडोद्यात झाली. ही व्याख्याने बडोद्यातील सनातनी मंडळींनी आयोजित केली होती. या पाच भाषणांना हजर राहून महाराजांनी स्वामी हंसस्वरूप यांची भूमिका समजून घेतली. धर्मातील 'जैसे थे वादी' तत्त्वज्ञानाचा त्यांचा आग्रह विज्ञानवादी सयाजीरावांना पटला नाही. या व्याख्यानांच्या अखेरीस उत्तर म्हणून केलेल्या भाषणात सयाजीरावांनी संस्कृत ग्रंथातील संदर्भ देत स्वामींचे सर्व मुद्दे

महाराजा सयाजीराव आणि श्रीधर व्यंकटेश केतकर / ८