पान:महाराजा सयाजीराव आणि श्रीधर व्यंकटेश केतकर.pdf/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराजा सयाजीराव
आणि
श्रीधर व्यंकटेश केतकर

 भारतीय समाज आणि संस्कृती 'जात' या अत्यंत चिवट घटकाने नियंत्रित केलेली आहे. ती फक्त जन्माधिष्ठित आहे असे नाही तर टोकाची विषमता अबाधित ठेवणारीसुद्धा आहे. महात्मा फुल्यांपासून भारतीय समाजाला हजारो तुकड्यांमध्ये विभागणाऱ्या जातिव्यवस्थेची गंभीर चिकित्सा सुरू झाली. परंतु जातिव्यवस्थेचा उगम आणि विकास यांच्या शास्त्रीय अभ्यासाला संस्थात्मक पाठबळ देणारा आधुनिक भारतातील पहिला प्रशासक सयाजीराव होते हा इतिहास गेल्या ७० वर्षात जातीच्या समाजशास्त्रीय अभ्यास करणाऱ्या एकाही अभ्यासकाच्या चर्चेत ओझरतासुद्धा आलेला नाही. परंतु जातीसंस्थेच्या उच्चाटनाबरोबरच तिच्या शास्त्रीय अभ्यासाला सयाजीरावांचे काय योगदान होते हे केतकरांच्या संदर्भाने समजून घेणे उपयुक्त ठरेल. जातीसंस्थेवरील जगातील पहिला पीएच. डी. प्रबंध सादर करणाऱ्या श्रीधर व्यंकटेश केतकरांच्या

महाराजा सयाजीराव आणि श्रीधर व्यंकटेश केतकर / ६