पान:महाराजा सयाजीराव आणि विठ्ठल रामजी शिंदे.pdf/८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

याच धर्तीवर भारतात पहिल्यांदा अस्पृश्यता निर्मूलनाचा राष्ट्रीय प्रश्न संस्थात्मक प्रयत्नातून हाताळला. म्हणूनच या दृष्टिकोनातून सयाजीराव आणि शिंदे यांच्यातील नाते समजून घेणे महत्त्वाचे ठरते.
सयाजीरावांची शिष्यवृत्ती
 २३ एप्रिल १८७३ रोजी कर्नाटकातील जमखंडी येथे जन्मलेल्या विठ्ठल रामजी शिंदे यांचे शिक्षण गंगारामभाऊ मस्के यांच्या डेक्कन मराठा असोसिएशन आणि सयाजीराव महाराज या दोघांच्या शिष्यवृत्तीवर झाले. ज्या डेक्कन मराठा असोसिएशनने पहिल्या टप्प्यात शिंदेंना शिष्यवृत्ती दिली त्या संस्थेला सयाजीरावांनी १८८५ ते १९३९ अशी ५४ वर्षे अखंडपणे आर्थिक पाठबळ दिले. ही मदत ५ लाख २९ हजार ५५६रु. . इतकी होती. आजच्या रुपयाच्या दरात या रकमेचे कमीतकमी मूल्य ७२ कोटी ४५ लाखांहून अधिक होईल. बाबासाहेबांप्रमाणेच अगदी पदवी शिक्षणापासूनच अप्रत्यक्षपणे महाराजांची मदत शिंदेंना मिळाली. परंतु गंगारामभाऊ म्हस्केंची शिष्यवृत्ती पुरेशी नसल्याने बी. ए. पदवी शिक्षण खर्चाच्या विवंचनेत असणाऱ्या विठ्ठल रामजी शिंदेंनी १८९६ मध्ये लक्ष्मणराव माने व खासेराव जाधव यांच्या मदतीने सयाजीरावांची भेट घेतली. या भेटीत सयाजीरावांनी त्यांना दरमहा २५ रु. स्कॉलरशिप मंजूर केली. ही स्कॉलरशिप देताना शिक्षणपूर्तीनंतर विठ्ठल रामजी शिंदेंनी

महाराजा सयाजीराव आणि विठ्ठल रामजी शिंदे / ८