पान:महाराजा सयाजीराव आणि रियासतकार सरदेसाई.pdf/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 'ब्राह्मणांनी आमचा इतिहास टाळला' असे म्हणत इतिहास लेखन करणाऱ्यांना तर तोंड दाखवायलाही जागा राहणार नाही असा हा इतिहास आता पुढे येत आहे. दुर्दैवाने बहुजनांच्या बाजूने इतिहास लेखन करणाऱ्या संशोधक-लेखकांची विश्वासार्हता यामध्ये संपणार आहे. हे आपल्या परंपरेला कमीपणा आणणारे आहे. परंतु परंपरा ज्यांच्या खांद्यावर आहे त्यांची दृष्टी जर कोती, आत्मकेंद्री आणि ढोंगी असेल तर असेच होणार. आता मात्र इतिहास लिहीत - सांगत असताना जबाबदारीने आणि प्रामाणिकपणे सांगण्याचा बोध यातून घ्यायला हवा.


●●●
महाराजा सयाजीराव आणि रियासतकार सरदेसाई / २६