Jump to content

पान:महाराजा सयाजीराव आणि राजा रवी वर्मा.pdf/२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

महाराजांची सर्व चित्रे पाहण्याची उत्सुकता वाढत होती. आल्या आल्या राजा रवी वर्मांची भेट घेऊन त्यांनी संपूर्ण राजवाडा राजा रवी वर्माना फिरवून दाखविला. ज्या दरबारात चित्रे लावायची होती, तो दरबारहॉलही दाखविला. दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ

वाजता राजा रवी वर्माच्या हवेलीत जाऊन चित्रे बघायचे ठरले. दरबारहॉलमध्ये कोणती चित्रे कुठे लावायची, याचे स्वातंत्र्यही राजा रवी वर्मांना देण्यात आले होते.
 दुसऱ्या दिवशी सकाळी बरोबर नऊ वाजता एकटे महाराज राजा रवी वर्माच्या हवेलीच्या दारात उभे होते. चित्रे पाहायची उत्सुकता वाढली होती. एकीकडे खुद्द महाराज हवेलीत आल्याने राजा रवी वर्मा आणि राज वर्माला महाराजांचे स्वागत कसे करावे

महाराजा सयाजीराव आणि राजा रवी वर्मा / २९