पान:महाराजा सयाजीराव आणि राजर्षी शाहू.pdf/१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

हे महापुरुष समाजाचे असताना त्यांना एका जातीत किंवा एका कंपूत जखडून ठेवण्याची करामत आपल्या संशोधकांनी केल्यामुळे त्यांच्यातील संवाद आपण गाडून टाकला. परिणामी आपली परंपरा श्रीमंत होण्याऐवजी गरीब झाली. अनुयायी आणि संशोधकांनी महासागराचे डबके केले. त्यामुळेच आज पुरोगामी चळवळ नष्ट झाली. परिणामतः राजर्षी शाहूंच्या पुढे असणारा सयाजीरावांचा आदर्श आणि शाहूंनी सयाजीरावांचे केलेले शब्दश: अनुकरण शेकडो पुरावे उपलब्ध असतानाही पुढे आले नाही. म्हणूनच इतिहास जोडून अभ्यासण्याची गरज आहे. असे केले तर उपलब्ध इतिहास क्रांतिकारक स्वरूपात बदलतो. इतकेच नव्हे तर तो अधिक वस्तुनिष्ठपणे समोर येतो. याच भूमिकेतून शोध घेतला असता कोल्हापूरचे 'ऊर्जाकेंद्र' बडोदा असल्याचा सिद्धांत प्रस्थापित होतो.
 सयाजीरावांनी १८८२ मध्ये अस्पृश्य आणि आदिवासींसाठी मोफत प्राथमिक शिक्षणाचा कायदा लागू केला. या निर्णयाचे अनुकरण करत पुढे १९९८ मध्ये शाहू महाराजांनी आपल्या कोल्हापूर संस्थानात सक्तीच्या मोफत प्राथमिक शिक्षणाचा कायदा लागू केला. सयाजीरावांनी त्यांच्या संस्थानातील सोनगड या ठिकाणी १८८२ ला अस्पृश्य व आदिवासींसाठी मोफत तसेच वसतिगृहाच्या विनामूल्य सुविधेसह हा निर्णय राबविला. पुढे ११ वर्षे या निर्णयाच्या अंमलबजावणीतील अडचणी अभ्यासून १८९३ मध्ये अमरेली प्रांतातील १० खेड्यांमध्ये सयाजीरावांनी

महाराजा सयाजीराव आणि राजर्षी शाहू / १७