पान:महाराजा सयाजीराव आणि मराठी पत्रकारिता.pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वर्तमानपत्रांचे प्रतिनिधी म्हणून गोविंद बाबाजी जोशी बडोद्याला गेले. कमिशनच्या कामकाजाची लोकांना माहिती व्हावी यासाठी त्यांनी मराठीतून वर्तमानपत्र छापण्यास सुरुवात केली. अच्युत अनंत चिपळूणकर यांनी आपल्या खाजगी छापखान्यात हे वर्तमानपत्र मोफत छापून दिल्याची आठवण गोविंद जोशी यांनी आपल्या माझ्या प्रवासाची हकिकत या पुस्तकात नोंदवली आहे. हे वर्तमानपत्र जरी चारच दिवस चालले असले तरी हे बडोद्यातील पहिले वर्तमानपत्र असल्याचे मत गणेश रंगनाथ दंडवते यांनी 'बडोद्याचे मराठी साहित्य' या ग्रंथात नोंदविले आहे.
बडोदावत्सल साप्ताहिक

 १८८१ मध्ये ज्या वर्षी सयाजीरावांना अधिकार प्राप्त झाले त्याच वर्षी रामजी संतुजी आवटे आणि दामोदर सावळाराम यंदे या दोन सत्यशोधकांनी मुंबई येथे 'शेतकऱ्यांचा कैवारी' या नावाचे साप्ताहिक सुरू केले. शेतकरीवर्ग सुशिक्षित व सुखी व्हावा आणि शेतकऱ्यांच्या अडचणी जगापुढे मांडता याव्य या उद्देशाने हे साप्ताहिक सुरू केले होते. या साप्ताहिकाचे यंदे संपादक होते. या पत्रात शेतकरी आणि मागासलेल्या जातींच्या सुधारणेसंदर्भात लेखन प्रकाशित होत होते. सोप्या भाषेत लिहिलेले या साप्ताहिकातील लेख सयाजीराव महाराजांना आवडत असत. या दरम्यान डॉक्टर शिवाप्पा हे महाराजांचे

महाराजा सयाजीराव आणि मराठी पत्रकारिता / ११