पान:महाराजा सयाजीराव आणि मराठी पत्रकारिता.pdf/१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

साली 'धनुष्य', १८९३-९४ साली अमृत सखाराम वणीकर यांचे ‘बालांकुर', जगन्नाथ विष्णू दामले व डॉ. गंगाधर बाळकृष्ण परांजपे यांचे धंदेशिक्षक' व माधव मैराळ सुरतकर यांचे ‘कलाशिक्षण' इ. मासिके निघत असत. यापैकी 'बालांकुर' हे मासिक ८-१० वर्षे नियमितपणे सुरू होते.
 यानंतर १९९० च्या दरम्यान 'रसिकविहार' नावाचे मासिक सुरू होते. १९१३ मध्ये जनार्दन सखाराम कुडाळकर यांचे 'लायब्ररी मिसलेनी', १९९४ मध्ये ' व्यायाम', १९२२ मध्ये सहविचारिणी सभेचे 'सहविचार' इ. विविध नियतकालिके बडोद्यात सुरू होती. 'लायब्ररी मिसलेनी' हे त्रैमासिक ७ वर्षे उत्तमप्रकारे सुरू होते. मात्र पुढे कुडाळकरांच्या अकाली निधनामुळे या त्रैमासिकाचे कामकाज रखडले गेले. यातील 'व्यायाम' आणि 'सहविचार' ही दोन मासिके मात्र सर्वाधिक काळ सुरू होती. याचबरोबर विद्याकल्पतरू, विचारसागर, देशभक्त, फत्तेसिंह गॅझेट, चंद्रशेखर इ. या विविध दैनिकांचा व मासिकांचा उदयास्त होत राहिला.
बडोद्यातील पहिले वर्तमानपत्र

 तत्कालीन बडोद्याचे रेसिडेंट कर्नल फेअर यांच्यावर विषप्रयोग केल्याप्रकरणी मल्हारराव महाराजांची चौकशी करण्यासाठी इंग्रज सरकारने कमिशन नेमले होते. या कमिशनच्या कार्यवाहीचे वार्तांकन करण्यासाठी मुंबईतील

महाराजा सयाजीराव आणि मराठी पत्रकारिता / १०