पान:महाराजा सयाजीराव आणि बौद्ध धर्म.pdf/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

‘प्राज्ञ' या देवतांमधील साम्य भट्टाचार्यांनी शोधून काढले. त्यांचे हे सर्व योगदान एकूणच बौद्ध धर्माच्या बुद्धोत्तर तत्त्वज्ञानाचे महत्त्व अधोरेखित करते. म्हणूनच सयाजीरावांनी प्राच्यविद्या संस्था २९ वर्षे भट्टाचार्यांच्या ताब्यात का दिली होती याचा खुलासा होतो.
 हिंदू धर्माला प्रतिक्रिया एवढा संकुचित विचार या जोडून घेण्यामध्ये नव्हता. कोणत्याही धर्माबद्दल टोकाचा द्वेषही नाही आणि टोकाचे प्रेमही नाही अशी अत्यंत संतुलित भूमिका घेत सयाजीरावांनी बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवन केले. वैयक्तिक जीवनात किंवा प्रशासकीय धोरणात त्यांनी कोणत्याही एका धर्माचा पुरस्कार कधीच केला नाही. तर धर्म स्वातंत्र्याबाबतचा व्यक्तीचा अधिकार आणि त्याची विवेकदृष्टी याचा महाराजांनी आदर केला. भारतातील आजच्या द्वेषजनक धार्मिक वातावरणात आणि प्रत्येक जातीच्या स्वजातकेंद्री संकुचित वृत्तीवर मात करण्यासाठी सयाजीरावांचा बौद्ध मार्ग हाच सर्वात परिपूर्ण पर्याय आहे. म्हणूनच नव्या पिढीने आता सर्वच धर्माबाबतच्या परंपरावादी डबक्याची कोंडी फोडण्याच्या दिशेने प्रवास करणे म्हणजे सयाजीरावांचे कृतिशील अनुयायी होण्याचा प्रयत्न आहे. या भूमिकेतून काम करणे अपरिहार्य ठरते.
सयाजीरावांचे बौद्ध कार्य आणि आंबेडकरांचे धर्मांतर

 आधुनिक भारतातील बौद्ध धर्माचा अधिकृत इतिहास तपासला असता सयाजीरावांच्या बौद्ध धर्मविषयक पथदर्शक कामाचा उल्लेख एका शब्दातसुद्धा सापडत नाही. ही बाब

महाराजा सयाजीराव आणि बौद्ध धर्म / २१