पान:महाराजा सयाजीराव आणि बौद्ध धर्म.pdf/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रकाशित केलेल्या या ग्रंथांची संख्या १३ भरते. या ग्रंथांची केवळ नावे पाहिली तरी या क्षेत्रातील बडोद्याच्या प्राच्यविद्या संस्थेचे महत्त्वपूर्ण स्थान सहज लक्षात येते. धर्माबाबत वैज्ञानिक दृष्टीने घेतलेली भूमिका आणि तुलनात्मक धर्म अभ्यासाचा पाया या अधिष्ठानावर बौद्ध धर्मातील वैज्ञानिक दृष्टी आणि समतावाद यांच्याशी सयाजीरावांनी अगदी तरुणपणे स्वतःला जोडून घेत होते हे सिद्ध होते.
सयाजीरावांनी प्रकाशित केलेले बौद्ध धर्मासंदर्भातील ग्रंथ:
 १) दीघनिकाय भाग - १ : चिंतामण वैजनाथ राजवाडे, (१९१८)
 २) जातकांतील निवडक गोष्टी, प्रथमार्ध : चिंतामण विनायक जोशी, (१९३०)
 ३) दीघनिकाय भाग २ रा : चिंतामण वैजनाथ राजवाडे, (१९३२)
 ४) बौध्दधर्म अर्थात धर्मचिकित्सा : रामचंद्र नारायण पाटकर, (१९३२)
 ५) भगवान बुध्दचरित्र व धर्मसार संग्रह : रामराव मार्तंड भांबुरकर, (१९३४)
 ६) बुद्धकालीन भारतीय समाज : ना. गो. कालेलकर, (१९३६)

 ७ ) Samarangana - Sutradhara ( 1924-25)

महाराजा सयाजीराव आणि बौद्ध धर्म / १४