पान:महाराजा सयाजीराव आणि बडोद्याचे कलाभवन.pdf/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराजा सयाजीराव
आणि
बडोद्याचे कलाभवन

 मानवाच्या भौतिक विकासात औद्योगिकीकरणाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. 'शाश्वत' औद्योगिकीकरणासाठी जनतेला अत्याधुनिक तंत्र शिक्षण देऊन तांत्रिकदृष्ट्या साक्षर करणे अत्यावश्यक ठरते. त्यामुळेच १८२५ पासून बहुतांश पाश्चिमात्य देशांमध्ये यांत्रिकी शिक्षण देणाऱ्या संस्थांमधून तरुणांना सामान्य विज्ञानविषयक अभ्यासक्रम शिकविले जाऊ लागले. ही पाश्चिमात्य देशांतील तंत्र शिक्षणाची सुरुवात मानली जाते. १८७५ पासून इंग्लंडमध्ये ३ ते ४ वर्ष कालावधीचे तांत्रिक अभ्यासक्रम शिकविणाऱ्या शैक्षणिक संस्थांची स्थापना करण्यास सुरुवात झाली. १० फेब्रुवारी १८९० रोजी सयाजीरावांनी बडोद्यात स्थापन केलेल्या कलाभवनने भारतीय जनतेच्या तांत्रिक साक्षरतेत 'दीपस्तंभा'ची भूमिका बजावली. भारताच्या तांत्रिक साक्षरतेतील या संस्थेने बजावलेली भूमिका समजून घेणे दिशादर्शक ठरेल.

महाराजा सयाजीराव आणि बडोद्याचे कलाभवन / ६